मुंबई

State Sugar Factories Reopen |राज्यातील बंद साखर कारखाने होणार सुरू

केंद्राने मागवली माहिती : एनसीडीसी, अमूल, इफ्कोमार्फत पुनरुज्जीवनाची तयारी

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : चंदन शिरखाळे

दीर्घकाळापासून बंद असलेले राज्यातील १९ सहकारी साखर कारखाने पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. यासाठी केंद्राने राज्य सरकारकडे बंद कारखान्यांची अद्ययावत माहिती, त्यांची आर्थिक स्थिती, मालकी हक्क, प्रलंबित कर्जे, न्यायालयीन वाद आणि पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा तपशील मागवला आहे.

राज्य सरकारकडून माहिती प्राप्त झाल्यानंतर प्रत्येक कारखान्याचा स्वतंत्र आढावा घेऊन पुनरुज्जीवनाचा आराखडा तयार केला जाणार आहे. त्यानुसार आर्थिक मदत, पुनर्गुतवणूक किंवा भागीदारीच्या माध्यमातून कारखाने सुरू करण्याचा पर्यायही केंद्र सरकारच्या विचाराधीन आहे. त्यासाठी राष्ट्रीय सहकारी विकास महामंडळ (एनसीडीसी), अमूल, इफ्को आदी सहकारी संस्थांची मदत घेण्याचा केंद्र सरकारचा प्रयत्न आहे.

राज्यात १९ सहकारी साखर कारखाने बंद

सध्या राज्यात सहकारी आणि खासगी मिळून २१० साखर कारखाने आहेत, तर विविध विभागांतील तब्बल १९ सहकारी साखर कारखाने सध्या बंद आहेत.

सोलापूर विभागात सर्वाधिक प्रमाण

सोलापूर विभागात सर्वाधिक पाच कारखाने बंद असून त्यामध्ये संतनाथ, श्री स्वामी समर्थ, शिवशक्ती, श्री आदिनाथ आणि श्री मकाई सहकारी साखर कारखान्यांचा समावेश आहे. संतनाथ कारखान्याने शेवटचा गाळप हंगाम २००८-०९ मध्ये घेतला होता, तर आदिनाथ आणि मकाई कारखाने २०२३-२४ च्या हंगामापर्यंत सुरू होते. शिवशक्ती कारखाना बांधकामाच्या टप्प्यातच बंद अवस्थेत आहे.

नांदेड विभागातील गोदावरी माणार आणि जय जवान जय किसान हे दोन कारखाने अनेक वर्षांपासून बंद आहेत. पुणे विभागातील राजगड, आर. पी. घोडगंगा आणि यशवंत सहकारी साखर कारखानेही आर्थिक संकटामुळे अडचणीत आले आहेत.

सांगली जिल्ह्यातील महाकाली आणि माणगंगा कारखाने २०१८-१९ नंतर बंद झाले. छत्रपती संभाजीनगर विभागातील महेश कडा, जामनेर, सिंदफणा आणि महात्मा ज्योतिबा फुले हे चार कारखाने विविध कारणांमुळे कार्यान्वित होऊ शकले नाहीत. सिंदफणा कारखान्याने आजपर्यंत एकही गाळप हंगाम घेतलेला नाही. अहिल्यानगर विभागातील कुकडी, डॉ बाबूराव तनपुरे आणि वसंतरावदादा पाटील हे सहकारी साखर कारखाने आर्थिक अडचण, बँकांची जप्ती आणि थकबाकीमुळे बंद आहेत. या सर्व कारखान्यांवर शासन भागभांडवल, हमी कर्ज, हमी शुल्क, एनसीडीसी कर्ज आणि शासकीय कर्ज अशा स्वरूपातील कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. कारखाने वर्षानुवर्षे बंद असल्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी, कामगार आणि वाहतूक व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे. हे कारखाने पुन्हा कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील रोजगाराला चालना मिळण्याबरोबरच ऊस उत्पादकांना स्थानिक स्तरावर गाळपाची सुविधा उपलब्ध होईल.

विविध वित्तीय संस्थांची साखर कारखान्यांकडील थकबाकी

१ संतनाथ

सरकारी भागभांडवल : १३६. ०९ लाख

हमी कर्ज - ८८१. ०४ लाख

हमी शुल्क - १२४. १९ लाख

सरकारी कर्ज - ७१७, ७७ लाख

(राज्य बँकेकडून कारखाना सील)

२ श्री स्वामी समर्थ

सरकारी भागभांडवल : १११३.४६

लाख

हमी कर्ज - ४५०, ७६ लाख

हमी शुल्क - १३८.३२ लाख सरकारी कर्ज ५२४. २० लाख

(राज्य बँकेकडून कारखाना सील)

३ शिवशक्ती

सरकारी भागभांडवल : ९१३. ३२ लाख सरकारी कर्ज - २३४.५६ लाख एनसीडीसी कर्ज ३८७४. ५१ लाख

४ श्री आदिनाथ

सरकारी भागभांडवल ६७८ लाख

हमी शुल्क - ५९. ३० लाख

सरकारी कर्ज २३४. ३८ लाख

एनसीडीसी कर्ज - ६३७६८.३३ लाख

(एनसीडीसीकडून कारखाना सील)

५ श्री मकाई

सरकारी भागभांडवल : ७३८. ५० लाख हमी शुल्क - १०१.१६ लाख

सरकारी कर्ज - २९. ९१ लाख

एनसीडीसी कर्ज - १४०० लाख

६ संतनाथ कारखान्याने शेवटचा गाळप हंगाम २००८-०९ मध्ये घेतला होता, तर आदिनाथ आणि मकाई कारखाने २०२३-२४ च्या हंगामापर्यंत सुरू होते. शिवशक्ती कारखाना मात्र बांधकामाच्या टप्प्यातच बंद अवस्थेत आहे.

नांदेड विभाग

७ गोदावरी माणार -

कर्ज ४७३. ५२ लाख.

नांदेड बँकेकडून कारखाना सील.

८ जय जवान जय किसान

कर्ज - ५४३. ९७ लाख

(राज्य बँकेकडून कारखाना सील)

पुणे विभाग

९ राजगड

सरकारी भागभांडवल : ७५२. ४५ लाख

हमी शुल्क - १२३.२८ लाख

ओएमबी कर्ज - २७२. २२ लाख

एनसीडीसी कर्ज ४५०० लाख

१० आर. पी. घोडगंगा

कर्ज - ५४३ लाख

राज्य साखर बँकेकडे कारखाना गहाण

११ यशवंत

सरकारी देणी - ३१४१. ५८ लाख (राज्य बँकेकडून कारखाना सील)

कोल्हापूर विभाग जिल्हा सांगली

१२ महाकाली

सरकारी भागभांडवल - ३५. ८३ लाख

सरकारी शुल्क - २७. ४६ लाख इतर कर्ज - ५४०. १७ लाख

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून

कारखाना सील.

१३ माणगंगा

एकूण कर्ज - ११९९. ५७ लाख

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून

कारखाना सील.

महाकाली आणि माणगंगा कारखाने

२०१८-१९ नंतर बंद झाले.

छत्रपती संभाजीनगर विभाग

१३ महेश कडा (बीड)

एकूण कर्ज - २८८१.२ लाख

१४ जामनेर (जळगाव)

एकूण कर्ज : ९८९. ३९ लाख

१५ सिंदफणा

१६ महात्मा जोतिबा फुले

हे चार कारखाने विविध कारणांमुळे कार्यान्वित होऊ शकले नाहीत. काही कारखाने अद्याप बांधकामाधीन आहेत. सिंदफणा कारखान्याने आजपर्यंत एकही

गाळप हंगाम घेतलेला नाही.

अहिल्यानगर विभाग

१७ कुकडी

सरकारी भाग भांडवल - ५९९. १५

लाख

कोजरेशन - १३४. ४१ लाख

१८ डॉ. बाबूराव तनपुरे

एकूण कर्ज - २०६८. ८५ लाख

अहमदनगर जिल्हा बँकेकडून

कारखाना सील.

१९ वसंतरावदादा पाटील

एकूण कर्ज - १०३४. ५५ लाख राज्य बँकेकडून कारखाना सील

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT