नवी मुंबई: पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमध्ये 28 मेपासून या दहा टक्के पाणी कपातीचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यामुळे येथील रहिवासी हवालदिल झाले आहेत. सिडको क्षेत्रामध्ये हेटवणे धरण, मोरबे धरण, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे बारवी धरण, मजीप्रा यांचे पाताळगंगा धरण येथून पाणीपुरवठा करण्यात येतो.
या धरणांतील उपयुक्त जलसाठा कमी होत असल्याने व पावसाळा अपेक्षेपेक्षा उशिरा सुरू होण्याची शक्यता विचारात घेता, उपलब्ध पाणीसाठा धरण भरेपर्यंत पुरेल अशा पद्धतीने नियंत्रित व काटेकोर वापर करणे आवश्यक झाले आहे.
नवी मुंबई महापालिकेने मोरबेवर अवलंबून असलेल्या भागाला तर पनवेल महापालिकेनेही आधीच कपात लागू केली आहे. आता सिडको आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांनीही आपल्या क्षेत्राकरिता पाणी कपातीचा निर्णय घेतला आहे.
पाणीपुरवठा,कधी बंद?
खारघर : सोमवार
तळोजा : शुक्रवार
कळंबोली, नावडे : बुधवार
कामोठे : शुक्रवार
पनवेल (पू) : सोमवार
नवीन पनवेल (प): मंगळवार
करंजाडे : गुरुवार
काळुंद्रे : शुक्रवार
करंजाडे : गुरुवार
काळुंद्रे : शुक्रवार
पाणीपुरवठा, कुठे बंद?
उलवे (सेक्टर-2, 3, 5, 6, 19, 19ए, 20, 21, 23, गव्हाण गाव व मोरावे गाव) : मंगळवार
उलवे (सेक्टर-8, 8 ए , 9, 10बी, 16, 16ए, 15, 17, 18, 24, कोपर, शिवाजी नगर, न्हावा, शेवा व बामणडोंगरी ) : शुक्रवार
उलवे (सेक्टर-25 व 25ए ), द्रोणागिरी : रविवार