महिला आयोगाच्या नोटिशीला चित्रा वाघ यांचे उत्तर, वाचा काय म्हणाल्या? Chitra Wagh Tweet
मुंबई

महिला आयोगाच्या नोटिशीला चित्रा वाघ यांचे उत्तर, वाचा काय म्हणाल्या?

अनुराधा कोरवी

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आणि अभिनेत्री उर्फी जावेद यांच्यातील वाद आता वाघ विरुद्ध महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकर असा चिघळला आहे. महिला आयोगाने पाठविलेल्या नोटिशीला चित्रा वाघ यांनी उत्तर दिले आहे. त्याची माहिती एक खोचक ट्विट करून दिली आहे. आता महिला आयोगाची काय भूमिका असणार याकडे सर्वांच लक्ष लागले आहे. (Chitra Wagh Tweet)

चित्रा वाघ यांनी ट्विट केले आहे, "मला नोटीस दिली हे जसं जाहीर सांगितलं. दिलेली नोटीस वितरित केली. तसंच हे उत्तरही सार्वजनिक करायला माझी काहीच हरकत नाही. असं खोचक ट्विट करत त्यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांना पुन्हा डिवचलं आहे.

काय आहे उर्फी प्रकरण

आपल्या हटके फॅशनमुळे उर्फी जावेद नेहमी चर्चेत असते. गेले काही दिवस ती चर्चेत आली आहे. कारण भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी तिच्या सार्वजनिक ठिकाणावरील पेहरावावर टीका करत. मुंबई पोलिसांना अटक करण्यास सांगितले होते. तसेच महिला आयोगाने तिच्यावर अद्याप कारवाई का केली नाही असा प्रश्न उपस्थित करत आयोगाच्या अध्यक्षा रुपाली यांना या वादात ओढले होते.

चित्रा वाघ आणि उर्फी जावेद यांच्यात सोशल मीडियावरील वॉर सुरु असतानाच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही एक ट्विट करत या वादात उडी घेतली. त्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी ही "राज्याला उर्फीमध्ये अडकवून, योगी महाराष्ट्रात येऊन बर्फी घेऊन गेले." असं खोचक ट्विट केले. हे सुरु असतानाच राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना नोटीस पाठवली आहे. नोटीशीनंतर चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांच्या नोटीशीला उत्तर दिले आहे. एक खोचक ट्विट करत त्यांनी याची माहिती दिली.

Chitra Wagh Tweet : माझा लढा सुरूच राहणार…चित्रा वाघ

भाजपच्या महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी महिला आयोगाला उत्तर दिलं आहे. याबाबतचे खोचक ट्विट करून त्यांनी माहिती दिली. यावेळी त्यांनी सीएमओ महाराष्ट्र, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र महिला आयोग, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकूळे, भाजपा मंगल प्रभात लोढा, भाजप महाराष्ट्र यांना टॅग केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हंटलं आहे की,"खुल्या समाजात उघडा नंगानाच सार्वजनिक जागांवर स्वैराचार याविरोधातील माझा लढा सुरूच राहणार. आपण समाजाचं देणं लागतो हे कोणीही कधीही विसरू नये. कर्तव्य म्हणून जबाबदारी मिळते ती जाणीव राखून टिकवायची असते. कर्तृत्व हे शाब्दिक नाही तर कृतीनंच असायला हवं."

पुढील ट्वीटमध्ये असं म्हंटल आहे की,"महिला आयोगाचा कायम सन्मान. दिलंय नोटिशीचं उत्तर. मला नोटीस दिली हे जसं जाहीर सांगितलं. दिलेली नोटीस वितरित केली. तसंच हे उत्तरही सार्वजनिक करायला माझी काहीच हरकत नाही. स्वैराचाराला लगाम घालणं ही फक्त माझीच जबाबदारी नाही तर कायद्यानं स्थापित झालेल्या महिला आयोगाचीही आहेच. माझा लढा सुरूच राहणार. जय हिंद…जय महाराष्ट्र"

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT