चिंचपोकळी, पुढारी वृत्तसेवा: गिरणगावातील १०४ व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळाच्या 'चिंचपोकळीचा चिंतामणी' चा शतकोत्तर चतुर्थ पाटपूजन सोहळा आज (दि.१३) झाला. मंडळाचे उपमानद सचिव अक्षय मिराशी यांच्या हस्ते चिंचपोकळी येथील मंडपात भक्तिभावाने आणि मंगलमय वातावरणात हा सोहळा पार पडला.
यावेळी डॉक्टर कंपाऊंड यांच्या वतीने साई भजन, श्री कला विद्यासंस्थानम यांच्या वतीने सामुहिक सतार वाजन, प्रथमेश राणे यांचे सेक्साफोन वादन तसेच शीळ वादक निखिल राणे यांच्या शीळ वादनावर अखंड तरुणाईने भक्तीमध्ये तल्लीन होऊन या सोहळ्याचा भक्तिभावाने आनंद घेतला.
यावेळी चिंतामणी भक्तांना सुरळीतपणे दर्शन व्हावे, यासाठी मंडळाचे अध्यक्ष श्री विद्याधर घाडी तसेच मानद सचिव श्री प्रणिल पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकारिणी सदस्यांनी सहाय्यक सदस्यांसह चोख व्यवस्था केली होती.
हेही वाचा