Chilli Price Hike | यावर्षी मिरचीचा जोरदार ठसका Adarsh Patil
मुंबई

Chilli Price Hike | यावर्षी मिरचीचा जोरदार ठसका

उत्पादनात चाळीस टक्क्यांनी घट किलोमागे २५० ते ३०० रुपये वाढ

पुढारी वृत्तसेवा

राजेंद्र पाटील

नवी मुंबई: यावर्षीच्‍या दुष्‍काळाचा फटका मिरचीलाही बसला असून, उत्‍पादनात सुमारे ४० टक्‍क्‍यांची घट झाली आहे. परिणामी मिरच्यांचे दर किलोमागे २५० ते ३०० रुपयांनी वाढले आहेत. सध्या बाजारात शीतगृहांत साठवणूक केलेला माल बाजारात आला असून, नवीन मिरची १० ते १५ डिसेंबरपासून मुंबईसह राज्यातील सर्व बाजारपेठांमध्‍ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

गेल्या वर्षी मिरचीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले होते. त्यामुळे सर्व मिरच्यांचे दर घसरले होते; मात्र यंदा मिरचीचे वाढलेले दर ग्राहकांना चांगलाच ठसका लावतील, अशी चिन्‍हे आहेत. कर्नाटक ब्‍याडगी, तेजा, संंकेश्वरी आणि काश्‍मिरी मिरचीच्‍या दरात किलोमागे २५० ते ३०० रुपयांची वाढ झाली.

राज्यात गुजरात, राजस्थान, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातून मिरची येते. त्यात सर्वाधिक आवक आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून होते. आंध्र प्रदेशातील तेजा जातीच्या मिरचीचे दर १६० रुपये किलोवरून २४० रुपयांवर गेले, तर ब्‍याडगी मिरची गेल्या वर्षी ४५० ते ५०० रुपये किलो होती. ती यावर्षी ६५० ते ७०० रुपये किलोपर्यंत गेली आहे. काश्‍मीरी मिरची ७५० रुपये किलो होती. ती वाढून ७८० रुपये किलोवर पोहोचली. संंकेश्वरी मिरची १३०० रुपयांवरून १५०० रुपयांपर्यंत वाढली.

या राज्या॑तून होते आवक

आंध्र प्रदेश, तेलंगणा ब्‍याडगी कर्नाटक काश्मिरी, संकेश्वरी कर्नाटक येथून मिरची महाराष्‍ट्रात येते. सर्वाधिक मिरचीची आवक आंध्र प्रदेशातील गुंटूर येथून होते.

* फेब्रुवारी ते मार्च हा बाजारात मिरच्या येण्याचा मुख्य महिना असतो. फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यात मसाल्याच्या लाल मिरचीला जास्त मागणी असते. जानेवारीत काश्‍मिरी मिरचीला मागणी असते. फेब्रुवारीपासून कर्नाटक ब्‍याडगी तर मार्च महिन्यात तेजा मिरचीला मागणी असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT