मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागच्या राजाचे सहकुटुंब घेतले दर्शन File Photo
मुंबई

Lalbaugcha Raja : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे घेतले दर्शन

मुख्यमंत्र्यांकडून लालबागच्या राजाचे सहकुटुंब दर्शन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : पुढारी ऑनलाईन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी राजाचे सहकुटुंब दर्शन घेऊन त्याची मनोभावे आरती केली. (Lalbaugcha Raja)

राज्यातील जनतेला सुखी, समाधानी, आनंदी ठेव राज्यातील बळीराजाच्या सर्व अडचणी दूर कर, यंदा पाऊस चांगला पडला आहे. त्यामुळे बळीराजाचे पीक चांगले येऊ देत असे मागणे त्यांनी श्री गणेशाच्या चरणी मागितले.

यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, पत्नी सौ. लता शिंदे, स्नुषा सौ. वृषाली शिंदे, नातू चि. रुद्रांश आणि इतर सर्व सहकारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT