मुंबई: केंद्रीय संस्कृत विश्व विद्यालयाच्या मल्टी टास्किंग कर्मचारी ग्रुप डी निवड परीक्षेत मुन्नाभाई स्टाईलने चौघांनी मोबाईलचा वापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी पवई पोलिसांनी चार जणा विरोधात गुन्हा नोंद केला आहे.
केंद्रीय विद्यालयामध्ये सीबीएसई बोर्डअंतर्गत पहिली ते बारावी पर्यंत शिक्षण दिले जाते. केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालयाच्या माध्यमातून ग्रुप डी शिपाई पदासाठी परीक्षा आज घेण्यात आली होती. आयआयटी पवई येथे ती परीक्षा होणार होती. १४ खोल्यामध्ये एकूण ३२४ उमेदवार हे परीक्षा देणार होते. तर प्रत्येक खोलीत २ असे १४ खोल्यामध्ये २८ पर्यवेक्षक याची नेमणूक केली होती.
सकाळी ९ ते १०.३० या वेळात परीक्षा होणार होती. उमेदवाराची तपासणी करून त्याना परीक्षा केंद्रात सोडले जात होते. परीक्षा सुरु झाल्यावर खोली क्रमांक ६९ मधून एका पर्यवेक्षकाने तक्रारदार याना आवाज दिला. एका उमेदवाराला सुरक्षा रक्षकाने पकडून ठेवल्याचे तक्रारदार याच्या लक्षात आले.
खोली क्रमांक ६९ मध्ये एक उमेदवार हा हालचाल करत असल्याचे एका पर्यवेक्षकाच्या लक्षात आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्या पॅन्टच्या खिशात काही लागले. त्यानंतर तो उमेदवार पळून जाऊ लागला.
त्या उमेदवारांच्या खिशात मॉडिफाइड डिवाइस मिळून आले. तसेच खोली क्रमांक २०, ६२, ६८,८१ मध्ये देखील असाच प्रकार झाला. त्या उमेदवाराकडे देखील मॉडिफाइड डिवाइस मिळून आले. याची माहिती पवई पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी ४ डिवाइस जप्त केले.