सांस्कृतिक विभागाकडून शासन निर्णय जारी  Pudhari Photo
मुंबई

Central Railway News | मध्य रेल्वेच्या २६ दिवाळी स्पेशल ट्रेन

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : दसरा-दिवाळी आणि छट पुजेकरिता मुंबई ते काझीपेट दरम्यान २६ स्पेशल ट्रेन चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांना गर्दीच्या वेळेस दिलासा मिळेल. ०७१९६ दादर-काझीपेट साप्ताहिक स्पेशल ट्रेन १७ ऑक्टोबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान दर गुरुवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजून ५० मिनिटांनी काझीपेटला पोहोचणार आहे. परतीच्या प्रवासाकरिता ०७१९५ ट्रेन १६ ऑक्टोबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान दर बुधवारी संध्याकाळी ५ वाजून ५ मिनिटांनी सुटून दादरला दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे. या ट्रेनला कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, उमरी, धर्माबाद, बासर, निझामाबाद, आर्रमुर, मेटपल्ली, कोराटला आणि लिंगमपेट जगित्याल स्थानकात थांबा दिला आहे. (Central Railway News)

०७१९८ दादर-काझीपेट स्पेशल ट्रेन १३ ऑक्टोबर ते १ डिसेंबर दरम्यान दर रविवारी दुपारी ३ वाजून २५ मिनिटांनी सुटून काझीपेटला दुसऱ्या दिवशी रात्री ९ वाजून ३० मिनिटांनी पोहोचणार आहे. परतीकरिता ०७१९७ ट्रेन १२ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर दरम्यान दर शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता सुटून दादरला दुसऱ्या दिवशी दुपारी १ वाजून २५ मिनिटांनी पोहोचणार आहे.

या ट्रेनला कल्याण, इगतपुरी, नाशिकरोड, मनमाड, नगरसोल, रोटेगांव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, परभणी, पूर्णा, हुजूर साहेब नांदेड, मुदखेड, भोकर, हिमायतनगर, सहस्रकुंड, किनवट, आदिलाबाद, पिंपळखुटी, लिंगटी, कायर, वणी, भांदक, चंद्रपूर, बल्लारशाह, सिरपुर कागजनगर, बेल्लमपल्ली, मंचिर्याल, पेड्डापल्ली आणि जम्मीकुंटा स्थानकात थांबा दिला आहे. प्रवासी या गाड्यांचे आरक्षण मंगळवारपासून करु शकतात.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT