Import of milk powder
केंद्र सरकारने १० हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे.  Pudhari News Network
मुंबई

Milk Powder Import : केंद्राने दूध पावडर आयातीचा निर्णय मागे घ्यावा

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क: केंद्र सरकारने दूध उत्पादकांच्या जखमेवर मीठ चोळत १० हजार टन दूध पावडर आयात करण्यासाठी परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने त्यांचा हा शेतकरी विरोधी निर्णय तातडीने मागे घ्यावा. आणि देशभरात पडून असलेल्या दूध पावडरला निर्यात अनुदान देऊन दूध उत्पादकांना उत्पादन खर्चावर आधारित किफायतशीर भाव दुधाला द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे राज्य समन्वयक डॉ. अजित नवले यांनी केली आहे.

दुधाचे भाव ३५ रुपयांवरून २५ रुपयांपर्यंत घसरले

महाराष्ट्रात आणि देशभरात साडेतीन लाख टन दुधाची पावडर गोदामांमध्ये पडून आहे. अतिरिक्त दूध उत्पादन झाल्याची आवई उठवून दुधाचे भाव ३५ रुपयांवरून पाडून २५ रुपयांपर्यंत खाली आणण्यात आलेले आहेत. दूध उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही त्यातून भरून निघत नाही. यामुळे दूध उत्पादक महाराष्ट्रभर मेटाकुटीला आलेले आहेत. आंदोलन करून आपल्या मागण्यांकडे ते सरकारचे लक्ष वेधू पाहत आहेत.

निर्यात अनुदान देऊन पावडर देशाबाहेर पाठवा

अशा परिस्थितीमध्ये देशात आणि महाराष्ट्रात पडून असलेल्या पावडरला निर्यात अनुदान देऊन ही पावडर देशाबाहेर कशाप्रकारे पाठवता येईल. याचा विचार करण्याऐवजी केंद्र सरकार आणखीन दुधाची पावडर आयात करणार असेल. तर यापेक्षा दुसरे दुर्दैव भारतीय शेतकऱ्यांचे कोणतेही असू शकत नाही, असे नवले यांनी म्हटले आहे.

SCROLL FOR NEXT