यंदा पहिलीपासून राज्यात ‘सीबीएसई’चे वेळापत्रक  Pudhari File Photo
मुंबई

यंदा पहिलीपासून राज्यात ‘सीबीएसई’चे वेळापत्रक

‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर अभ्यासक्रम; पाच वर्षांत पूर्णत : नवे बदल

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : राज्यात येत्या शैक्षणिक वर्षात (2025-26) पहिलीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हा ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर तयार केला जाणार आहे. या नव्या बदलानुसार पहिलीच्या वर्गाची नवीन पुस्तके येत्या जूनपूर्वी उपलब्ध करून दिली जाणार आहेत. याबरोबरच ‘सीबीएसई’ केंद्रीय मंडळाच्या धर्तीवर वेळापत्रकाची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र, यंदा शाळा 15 जूनपासून सुरू होणार आहेत. ही माहिती शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी गुरुवारी विधान परिषदेत दिली.

  • शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांची विधान परिषदेत माहिती

  • पुढील शैक्षणिक सत्र 15 जूनपासून

  • त्यानंतर 1 एप्रिलपासून सत्र सुरू करण्याचा विचार

राज्यात नवीन शैक्षणिक धोरणानुसार, ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर असलेल्या अभ्यासक्रमानुसारच पुस्तके तयार केली जात आहेत. पहिली ते बारावी पुस्तकेही यानुसार टप्प्याटप्प्याने बदलणार आहेत. ही संपूर्ण प्रक्रिया पाच वर्षांत पूर्ण केली जाणार आहे. याबरोबरच राज्यात टप्प्याटप्प्याने ‘सीबीएसई’ केंद्रीय मंडळाचे वेळापत्रक लागू करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

शाळांचे भविष्यातील शैक्षणिक वेळापत्रक ‘सीबीएसई’प्रमाणे केले जाणार आहे. यंदा परीक्षाच 24 एप्रिलपर्यंत चालणार असल्याने ‘सीबीएसई’प्रमाणे 1 एप्रिलपासून शैक्षणिक वर्ष सुरू होणार नाही. यंदा 15 जूनपासूनच शाळा सुरू होणार आहेत. यासंदर्भातील शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून जारी करण्यात येणार आहे. यामुळे अनेक प्रश्न शाळा आणि शिक्षण क्षेत्रातून उपस्थित होत आहेत. राज्यात यंदा विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रम हा ‘एनसीईआरटी’च्या धर्तीवर तयार केला जाणार आहे व वेळापत्रक ‘सीबीएसई’प्रमाणे असणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातून देण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT