Dawood Ibrahim Musafirkhana Demolition Drive Pudhari
मुंबई

Dawood Building Demolition | अखेर दाऊदच्या इमारतीवर हातोडा; मुसाफिरखाना पाडकामाला सुरुवात

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत रात्री उशिरा झाला निर्णय

पुढारी वृत्तसेवा

Dawood Ibrahim Musafirkhana Demolition Drive

मुंबई : भेंडी बाजार, पाकमोडिया इस्टेट येथील अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचे घर असलेल्या मुसाफिरखाना इमारतीच्या पाडकामाला गुरुवारी (दि.१९) सकाळपासून कडक बंदोबस्तात सुरुवात झाली. गुरुवारी रात्री उशिरा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत इमारतीवर कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मुसाफिरखाना इमारतीच्या तळमजल्यावर असलेले मस्जिद यामुळे कारवाईला मुस्लिम समाजाने केलेला विरोध, त्यात आमदार अमीन पटेल यांनी केलेला हस्तक्षेप, यामुळे बुधवारी होणारी कारवाई पुढे ढकलण्यात आली.

या कारवाईदरम्यान कायदेशीर अडचणी दूर करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची बुधवारी रात्री मॅरेथॉन बैठक झाली. अखेर विधी विभागाने दिलेल्या ग्रीन सिग्नलमुळे अखेर गुरुवारी सकाळी पालिकेचे अतिक्रमण निर्मूलन पथक घटनास्थळी पोहचले. बुलडोझर, हातोडा व अन्य यंत्रणेच्या सहाय्याने कारवाईला सुरुवात झाली.

यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पालिकेचे ५० ते ६० पेक्षा जास्त कामगार व यंत्रणा घटनास्थळी मेहनत करण्यात आली आहे. या कारवाईचे नेतृत्व पालिकेच्या सी विभागाचे सहाय्यक आयुक्त सुनील माने करीत असून प्रताप पालिका आयुक्त अश्विनी भिडे या कारवाईवर लक्ष ठेवून आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT