Chief Minister Eknath Shinde in Vidhan Bhavan
विधान भवन परिसरात महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राख्या बांधल्या.  Pudhari News Network
मुंबई

Maharashtra Budget |अर्थसंकल्पातून भेट; महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंना बांधल्या राख्या

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : राज्याच्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेऊन त्यांना दिलासा दिल्याबद्दल विविध क्षेत्रातील महिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधत त्यांचे आभार मानले. तर मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करत असल्याचे सांगत मुख्यमंत्री शिंदे यांनी त्यांना अनोखी ओवाळणी दिली.

अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय

विधान भवनाच्या प्रांगणात आज (दि.२९) विविध क्षेत्रातील महिलांनी एकत्र जमल्या होत्या. विधिमंडळात शुक्रवारी सादर झालेल्या अर्थसंकल्पात महिलांसाठी अनेक निर्णय घेण्यात आले. या निर्णयामुळे राज्यतील महिलांना मोठा दिलासा मिळाल्याने त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ओवाळून राखी बांधून त्यांचे आभार मानले.

२५ लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट

यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्री माझी बहिण योजनेची अंमलबजावणी १ जुलैपासून करणार आहे. महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळणार आहेत. याचा अडीच कोटींहून जास्त महिलांना लाभ होणार आहे. त्यासोबत महिलांना वर्षातून ३ सिलेंडर मोफत देणाऱ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनाही लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. २५ लाख महिलांना लखपती दीदी बनविण्याचे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले आहे. बचतगटांचे खेळते भांडवल १५ हजारांवरून ३० हजार केले आहे. मुलींना उच्च शिक्षणापर्यंतचे शिक्षण मोफत देण्याचा निर्णय घेतला आहे. १० हजार महिलांना पिंक रिक्षांचे वाटप करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महिलांना मोफत प्रवास, ५० टक्क्यांपर्यंत मोफत एसटी प्रवास यापूर्वीच दिलेला आहे.

यावेळी मंत्री दादाजी भुसे, आमदार प्रताप सरनाईक, आमदार नरेंद्र भोंडेकर आणि विविध क्षेत्रातील महिला उपस्थित होत्या.

SCROLL FOR NEXT