मुंबई : गॅस गळतीकडे दुर्लक्ष केल्याने कांदिवलीत सहा जणांचा बळी गेल्यानंतर मुंबई महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले आहे. असे अपघात टाळावेत यासाठी आजपासून १७ ऑक्टोबरपर्यंत विशेष जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या पुढाकाराने आणि भारत पेट्रोलियम व हिंदुस्थान पेट्रोलियम या गॅस सिलिंडर वितरण करणाऱ्या कंपन्यांच्या सहकार्याने मुंबईत ३५० पेक्षा अधिक ठिकाणी ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत, अशी माहिती प्रमुख अग्निशमन अधिकारी रवींद्र आंबुलगेकर यांनी दिली आहे.

भायखळा येथील मुंबई अग्निशमन दलाच्या मुख्यालयात आयोजित बैठकीत नियोजन ठरवण्यात आले. सिलिंडर वापराबाबत प्रात्यक्षिकांसह प्रबोधन व जनजागृती करण्यात येणार आहे. संयुक्त पद्धतीने अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. वितरण साखळीत असणारे अधिकारी, कर्मचारी आणि ग्राहकांच्या घरी सिलिंडर देणारे कामगार यांनाही प्रशिक्षण देण्यात येणार आहेत.
मुंबईतील गॅसधारक असे ...
सुमारे २५ लाख ७८ ग्राहकांपर्यंत गॅस सिलिंडरचा सुरक्षित वापर करण्याबाबत सविस्तर माहिती प्रात्यक्षिकांसह पोहोचावी व ती नियमितपणे देण्यात येणार आहे.
भारत पेट्रोलियम :
घरगुती - १४,५०,०००
व्यावसायिक - ३८,०००
हिंदुस्तान पेट्रोलियम :
घरगुती - १०,५०,०००
व्यावसायिक - ४०,०००
एकूण
घरगुती - २५,००,०००
व्यावसायिक - ७८,०००