पुढारी ऑनलाईन डेस्क : अमली पदार्थ तस्करी प्रकरणी मोठी कारवाई करत मुंबईतील बोरिवली पोलिसांनी ४७ लाख २० हजार रुपयांचे हेरॉईन जप्त केले आहे .यात २ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या आरोपींपैकी शाहवाझमा (वय 24 वर्षे रा. शालिग्राम नाका, काशिमीरा, मीरा रोड) याच्याकडून 17 लाख 40 हजार रुपये किमतीचे 170 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले. तर दूसरा आरोपी अभिषेक रामजीलाल कुमार (25 वर्षे – ऑस्ट्रा मावा, काशिमीरा ) या ड्रग पेडलरकडून 21 लाख रुपये किमतीचे 210 ग्रॅम हेरॉईन जप्त करण्यात आले.
या आरोपींनी हे अंमली पदार्थ बूट व चप्पल च्या सोल मध्ये लपवले होते. पोलिसांकडून ते बुट व चप्पल जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई मा. अतिरिक्त पोलीस आयुक्त अभिषेक त्रिमुले, उपपोलीस आयुक्त आनंद भोईटे, सहायक पोलीस आयुक्त सुनील जायभाये यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पोलीस निरीक्षक मालोजी शिंदे, सहायक निरीक्षक प्रदीप काळे यांनी सहभाग घेतला.