Mumbai Pune Accident Pudhari
मुंबई

Mumbai Pune Accident: बोरघाटात ब्रेक फेल टेम्पोची कमानीला धडक; लोखंडी पाईप कारवर कोसळून भीषण अपघात

मुंबई–पुणे जुना महामार्ग आणि एक्स्प्रेसवेवर एकाच दिवशी अपघातांची मालिका; सुदैवाने जीवितहानी टळली

पुढारी वृत्तसेवा

टेम्पोची कमानीला जोरदार धडक

खोपोली : मुंबई- पुणे जुन्या महामार्गावरील बोरघाटातील अंडा पॉईंडजवळ एका ब्रेक निकामी झालेल्या टेम्पोने समोरील हाईट्स बॅरिकेट्सला जोरदार धडक दिल्याने त्यातील लोखंडी पाईप हे बाजूच्या दोन कारवर पडून त्या खाली दबल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सुदैवाने या कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र दोन्ही कारचा चक्काचूर झाला असून त्या कारमध्ये एक चालक अडकल्याने तो जखमी झाला आहे. असून अन्य एक जण जखमी झाले आहेत.

टेम्पो हा पुण्याहून मुंबईकडे लोखंडी पाईप घेऊन जात असताना तो दस्तुरी येथील तीव्र उतारावर आला असता त्याचे ब्रेक फेल झाले. समोरील अंडा पॉईंट जवळील कमानीला जोरदार धडक देऊन टेम्पो कमानीत जाऊन अडकला. टेम्पोमधील लोखंडी पाईप हे शेजारील दोन कारवर पडल्याने दोन्ही कारचा चक्काचूर झाला तर एका कारमध्ये चालक अडकल्याने त्याला तात्काळ बाहेर काढल्याने तो थोडक्यात बचावला आहे, तर दुसऱ्या कारमधील एक प्रवासी जखमी झाला.

एक्स्प्रेस वे वर तीन वाहनांची धडक

खोपोली शहर :

पुणे एक्स्प्रेस वेवर शनिवारी पहाटे एका उभ्या असलेल्या कारला टेम्पोने पाठीमागून जोरदार धडक दिली तर कारने समोरील कंटेनरला धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र भीषण अपघात झाला असून यात कोणीही जखमी झाला नाही मात्र कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरून कंटेनर हा चालक भरूच कुमार यादव कंटेनर मुंबईहुन पुण्याकडे घेऊन जातं असताना आडोशी बोगद्याजवळ आला असता ट्राफिकमुळे तिसऱ्या लेनला उभा असताना स्विफ्ट चालक आदित्य सिंग गौतम याने आपली कार दुसऱ्या लेन मध्ये उभी केली असता पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकनेे कारला पाठीमागून जोरदार धडक दिली तर कारने समोरील कंटेनरला जोरदार धडक दिल्याने तीन वाहनांचा विचित्र अपघात झाला आहे यात कोणीही जखमी झाले नसून कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT