मुंबई

कमकुवत सरकारमुळे सीमावाद वाढतोय केंद्राचे हस्तक राज्याचे पाच तुकडे करतील : संजय राऊत

अमृता चौगुले

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : सध्या महाराष्ट्रात अत्यंत कमजोर आणि हतबल सरकार असल्यामुळे महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद निर्माण होत आहे. राज्यातील सरकार लवकर घालवले नाही तर राज्याचे पाच तुकडे लगावला. केल्याशिवाय केंद्र सरकार आणि त्यांचे हस्तक राहणार नाहीत, असा आरोप शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी बुधवारी केला.

कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी जत तालुक्यातील ४० गावांचा कर्नाटकात समावेश करण्याबाबतचे विधान केले. या पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील शिंदे फडणवीस – सरकारवर हल्लाबोल केला.
कोणाला मुंबई तोडायचीय तर कोणाला महाराष्ट्राचे जिल्हे आणि गावे तोडायची आहेत. गेल्या साडेतीन महिन्यापासून महाराष्ट्र

कुरतडण्याचे काम सुरु आहे. राज्यातील सरकार लवकरात लवकर न घालवल्यास केंद्राचे हस्तक राज्याचे पाच तुकडे केल्याशिवाय राहणार नाहीत, असे राऊत म्हणाले. तसेच, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ४० आमदारांना घेऊन गुवाहाटीला निघाले आहेत. तिकडून आल्यावर आसामच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील एखाद्या जिल्ह्यावर दावा करु नये म्हणजे झाले, असा टोलाही त्यांनी राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यामुळे आपण महाराष्ट्राचे लचके तोडू असे अनेक राजकीय दरोडेखोरांना वाटत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत आहे. राज्यपाल तसेच भाजपाचे प्रवक्ते चुकीची वक्तव्ये करत आहेत. त्यावर मुख्यमंत्री काही बोलायला तयार नाहीत. तर, उपमुख्यमंत्री त्याचे समर्थन करत आहेत, असे राऊत म्हणाले. दरम्यान, दिशा सालीयन यांचा मृत्यू अपघाती असल्याचा निष्कर्ष सीबीआयने काढला असेल तर आता भाजपाच्या नेत्यांनी आदित्य ठाकरे यांची माफी मागायला हवी. आदित्य ठाकरेंसारख्या एका तरूण नेत्याची बदनामी का करत होतात. केंद्रीय यंत्रणांचा निष्कर्ष आला असेल तर आरोप करणाऱ्या भाजपा नेत्यांनी ताबडतोब माफी मागायला हवी, असेही राऊत म्हणाले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT