मुंबई

High Court : "हीच का तुमची कार्यक्षमता?" : रुग्णालय कर्मचारी मारहाण प्रकरणी हायकोर्टाकडून पालघर पोलिसांची खरडपट्टी

पालघर डॉक्टर्स असोसिएशनच्‍या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी

पुढारी वृत्तसेवा

Palghar hospital staff assault Case

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : "हीच का तुमची कार्यक्षमता?, एफआयआर दाखल होताच ९ आरोपी पळून जातात कसे? जर तुमच्याने होत नसेल तर आम्ही तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करतो,"अशा शब्‍दांमध्‍ये पालघरमधील रुग्णालयातील कर्मचाऱ्याला मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांची खरडपट्टी काढली. या घटनेविरोधात पालघर डॉक्टर्स असोसिएशनने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पालघरच्या रुग्णालयातील कर्मचाऱ्याला शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाली होती.

१० आरोपींपैकी नऊ आरोपी फरार असल्याने हायकोर्टाची तीव्र शब्दात नाराजी

सुनावणी दरम्यान पालघरचे पोलीस अधीक्षक यतिश देशमुख उपस्थित होते. या प्रकरणातील १० आरोपींपैकी नऊ आरोपी फरार असल्याने उच्च न्यायालयाने तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. "हीच तुमची कार्यक्षमता?" असा थेट सवाल उच्च न्यायालयाने पोलिसांना विचारला. तसेच, "एफआयआर दाखल होताच ९ आरोपी पळून जातात कसे? जर तुमच्याने होत नसेल तर आम्ही तपास मुंबई गुन्हे शाखेकडे वर्ग करतो," अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांना बजावले.

ही केस डायरी म्हणजे केवळ औपचारिकता...

यासोबतच केस डायरी नियमित न ठेवल्याबद्दल न्यायालयाने पोलिसांची कानउघडणी केली. "ही केस डायरी म्हणजे केवळ औपचारिकता आहे. अशी केस डायरी हे बीएनएसएस (BNSS) चे उल्लंघन आहेच, पण पोलीस महासंचालकांनी काढलेल्या आदेशाचे देखील उल्लंघन आहे," अशा शब्दांत उच्च न्यायालयाने पालघर पोलिसांना खडसावले.

थेट पोलीस महासंचालकांकडून निर्देश घेण्याचे सूचना

दरम्यान, तपास अधिकाऱ्यावर कोणती प्रशासकीय कारवाई करणार याचे थेट पोलीस महासंचालकांकडून निर्देश घेण्याचे सूचना उच्च न्यायालयाने सरकारी वकिलांना दिल्या आहेत. या प्रकरणावर आज सायंकाळी पाच वाजता पुन्हा सुनावणी होणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT