Bombay High Court file photo
मुंबई

High Court: महाराष्ट्राच्या न्यायव्यवस्थेत मोठी खळबळ! मुंबई उच्च न्यायालयाने २ वरिष्ठ न्यायाधीशांना केले बडतर्फ, कारण काय?

न्यायव्यवस्थेतील गैरवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे.

मोहन कारंडे

Bombay High Court

मुंबई: न्यायव्यवस्थेतील गैरवर्तनावर मुंबई उच्च न्यायालयाने मोठी कारवाई केली आहे. गंभीर गैरवर्तनाच्या आरोपाखाली उच्च न्यायालयाने दोन वरिष्ठ जिल्हा-स्तरीय न्यायाधीशांना सेवेतून बडतर्फ केले आहे. १ ऑक्टोबर रोजी या दोन्ही न्यायाधीशांना तातडीने निलंबित करण्यात आले.

कोण आहेत हे न्यायाधीश?

सेवेतून काढण्यात आलेल्या या न्यायाधीशांमध्ये साताऱ्याचे जिल्हा न्यायाधीश-३ आणि अतिरिक्त सत्र न्यायाधीश धनंजय एल. निकम आणि पालघरचे दिवाणी न्यायाधीश (वरिष्ठ स्तर) इरफान आर. शेख यांचा समावेश आहे. उच्च न्यायालयाच्या सर्वोच्च स्तरावर हा निर्णय घेण्यात आला असून, कार्यरत न्यायिक अधिकाऱ्यांवर इतकी निर्णायक कारवाई होण्याची ही दुर्मिळ घटना असल्याचे हे वृत्त Free Press Journal ने दिले आहे.

निकम यांच्यावरील लाचखोरीचा आरोप

सातारा येथे दाखल केलेल्या एफआयआरनुसार, निकम यांनी स्थानिक मध्यस्थांमार्फत तक्रारदार संयुक्ता होळकर यांच्याकडून तिच्या वडिलांना जामीन मिळवून देण्यासाठी स्थानिक मध्यस्थामार्फत ५ लाख रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तिचे वडील राजेंद्र होळकर हे एका फौजदारी प्रकरणात न्यायालयीन कोठडीत होते. निकम यांची अटकपूर्व जामीन याचिका डिसेंबर २०२४ मध्ये सत्र न्यायालयाने आणि यावर्षी मार्चमध्ये मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली होती. त्यांच्या निलंबनानंतर, उच्च न्यायालय प्रशासनाने असा निष्कर्ष काढला की त्यांच्या वर्तनामुळे न्यायालयीन निष्ठेला गंभीर धक्का बसला आहे, ज्यामुळे त्यांना भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत बडतर्फ करण्यात आले.

शेख यांच्यावर अमली पदार्थांच्या व्यसनाचा आरोप

न्यायाधीश इरफान आर. शेख यांचे प्रकरणही तितकेच धक्कादायक आहे. अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक पदार्थ (NDPS) कायद्यांतर्गत खटले हाताळण्याची जबाबदारी असताना, ते स्वतःच अंमली पदार्थांच्या प्रभावाखाली असल्याचे आढळून आले. उच्च न्यायालयाच्या प्रशासनाने आदेश दिलेल्या पॅथॉलॉजी चाचण्यांमध्ये ही बाब स्पष्ट झाली. तसेच, त्यांनी आपल्या पदाचा वापर करून त्यांच्याविरुद्धचा अपघाताचा गुन्हा दाखल होण्यापासून रोखण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्यांचे वर्तन न्यायिक जबाबदारीसाठी पूर्णपणे अयोग्य मानून उच्च न्यायालयाने त्यांची सेवा रद्द केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT