मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या दक्षिण मुंबईमधील प्रभाग क्रमांक १९४ मध्ये अत्यंत चुरशीची ठरलेली निवडणूक अखेर निकालात निघाली आहे. या हायव्होल्टेज लढतीत उबाठाचे निशिकांत शिंदे यांनी बाजी मारली असून, त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार शिंदे सेनेचे समाधान सरवणकर यांचा दारूण पराभव केला आहे.
सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत दोन्ही उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर पाहायला मिळाली. मुंबई महापालिका निवडणुकीत शिंदेसेनेच्या दोन बड्या नेत्यांना हादरा बसला आहे. वायकरांपाठोपाठ शिंदे गटाचे माजी आमदार सदा सरवणकर यांना धक्का बसला आहे. त्यांचे चिरंजीव समाधान सरवणकर हे पराभूत झाले असून ठाकरे गटाचे आमदार सुनील शिंदे यांचे भाऊ निशीकांत शिंदे विजयी झाले आहेत. विधानसेभेतील पराभवनानंतर सदा सरवणकर यांना हा मोठा धक्का आहे.
निशिकांत शिंदे २५,२१४ मते, तर समाधान सरवणकर यांना २३,५८७ मते मिळाली. उबाठाचे निशिकांत शिंदे यांनी समाधान सरवणकर यांच्यावर १,६२९ मतांनी मात करत विजय संपादन केला. समाधान सरवणकर यांच्यासारख्या तगड्या उमेदवाराला पराभूत केल्याने निशिकांत शिंदे यांचा हा विजय राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराचा विजय झाल्याने ठाकरेंनी दक्षिण मुंबईत गड राखला आहे.