रक्तपेढ्यांमध्ये जाणवतोय रक्ताचा तुटवडा Pudhari News Network
मुंबई

Blood Shortage : मुंबईत रक्ताचा तुटवडा; 1101 युनिट शिल्लक

दुर्मीळ ब्लड ग्रुप आऊट ऑफ स्टॉक; रुग्णांच्या नातेवाइकांची ब्लड बँकांमध्ये धावपळ सुरू

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : मुंबईत रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. रक्तपेढ्यांमध्ये फक्त ११०१ युनिट रक्त शिल्लक आहे. विशेष म्हणजे बी निगेटिव्ह, ओ निगेटिव्ह, एबी निगेटिव्हसारखे दुर्मीळ रक्तगट तर पूर्णतः संपले आहेत. त्यामुळे रुग्णांचे नातेवाईक एक युनिट रक्तासाठी हेलपाटे मारत आहेत.

मुंबईसारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या शहरात १,१०१ युनिट रक्त हा आकडा अत्यंत अल्प मानला जात आहे. अनेक प्रमुख ब्लड ग्रुपचा साठा संपल्याने शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याची वेळ आली आहे. बी निगेटिव्ह आणि ओ निगेटिव्ह रुग्णांसाठी तर जीव मुठीत घेऊन येरझारा मारत आहेत.

परिषदचे आपत्कालीन आदेश

सहायक संचालक डॉ. पुरुषोत्तम पुरी यांनी सर्व रक्तकेंद्रांना तातडीने स्वैच्छिक रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे निर्देश दिले आहेत. कॉलेज-शाळांच्या सुट्ट्यांमुळे दात्यांची संख्या घटल्याचे सांगण्यात येत असले, तरी सामाजिक व राजकीय संस्थांमार्फत शिबिरांचे नियोजन सुरू करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

सोशल मीडियावर रक्तदात्यांसाठी हाक

रक्ताच्या तुटवड्यामुळे समाजमाध्यमांवर रक्तदानाची मोहीम वेगाने पसरली आहे. अनेक रुग्णांच्या कुटुंबीयांनी मदतीसाठी सोशल मीडियाचे माध्यम गाठले आहे.

सरकारी रुग्णालयांतच गंभीर स्थिती

  • केईएम - १३ युनिट

  • नायर - १४ युनिट

  • सायन - ८ युनिट

  • शताब्दी - फक्त ए+ १

  • भाभा - फक्त बी + १

  • राजवाडी - १२ युनिट

  • जे.जे. - १८ युनिट

  • कामा - ९ युनिट

  • सेंट जॉर्ज - ११ युनिट

नवी मुंबईतही टंचाई

वाशी : नवी मुंबई महापालिका रुग्णालयांतही रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. परिणामी नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन नवी मुंबई महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. महापालिकेच्या वाशी से-१० येथील प्रथम संदर्भरुग्णालयात रक्तटंचाई आहे. सुट्ट्यांमुळे अनेक कार्यालये, महाविद्यालये बंद असल्याने अनेक संस्था, राजकीय पक्ष सामाजिक कार्यकर्ते यांना रक्तदान शिबिरांचे आयोजन कर शक्य झाले नाही. त्याचा परिणाम म्हणून रक्तपेढ्यांमध रक्ताचा साठा कमी झाला आहे. रक्तदान हे केवळ काह मिनिटांचे काम असून, त्यामुळे तीन रुग्णांचे जीव वा शकतात. त्यामुळे एकंदरीत ही परिस्थिती लक्षात घेवा रक्तपेढीत येऊन रक्तदान करावे, असे आवाहन वैद्यकीय समाजसेविका सरिता खेरवासीया यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT