The mayor of Mumbai will be a Marathi person.
मुंबई : भाजपने सोमवारी (दि.29) रोजी जाहीर केलेल्या 66 उमेदवारांच्या पहिल्या यादीत जवळपास वीस जागांवर अमराठी उमेदवार देण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईचा महापौर मराठीच होणार असा दावा करणाऱ्या भाजपचा खरा चेहरा उघड झाला असल्याची टीका मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
भाजप मुंबईत जवळपास 140 जागांवर उमेदवार उभे करणार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत जवळपास 105 जागांवरील उमेदवार नक्की करण्यात आले आहेत. तर, सुमारे 66 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर झाली आहे. यातील अमराठी नावांवरून राजकीय वादंगाला सुरूवात झाली आहे.
याच अमराठी उमेदवारांच्या नावावरून मनसेने भाजपला लक्ष्य केले आहे. महापौर पदावरून वादंग झाल्यानंतर भाजप नेत्यांनीही मुंबईचा महापौर मराठीच असेल, अशी भूमिका मांडायला सुरूवात केली होती. तर, मनसेने भाजपला अमराठी महापौर बसवायचा असल्याचा आरोप लावून धरला होता.