Rat Bite Video Bhayandar: मुंबईतील बाईंदर मधील पंडित भिमसेन जोशी सरकारी रूग्णालात उंदराने महिलेचा हात कुरतडल्यानं तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी जिल्हा शल्य चिकित्सक जाफर तडवी यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. राज्य सरकारने देखील या प्रकरणाची चौकशी करण्याचे तातडीचे आदेश दिले आहेत. तसेच या प्रकरणाशी संबंधित असलेले डॉक्टर शंतनू कुंडगीर यांची बदली करण्यात आली असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे.