माझ्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानतो. आम्हाला निधी देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी नेहमीच अशी माझी काळजी घ्यावी, असा टाेला शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि विधानसभेतील गटनेते भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी आज (दि. १) माध्यमांशी बाेलताना लगावला.
"भास्कर जाधव यांच्या मनात काय आहे हे ते स्वत: सांगू शकतात. सध्या कविता, शेरोशायरी यातून ते आपल्या मनातील भावना व्यक्त करत आहेत. आता त्यांचे नवीन स्टेटस येईल, त्यावरून तुम्ही अंदाज बांधा, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सोमवारी माध्यमांशी बोलताना म्हणाले हाेते. यावर बोलताना भास्कर जाधव म्हणाले की, माझ्याकडे लक्ष दिल्याबद्दल मी मुख्यमंत्र्यांचे धन्यवाद मानतो. त्यांनी नेहमीच अशी माझी काळजी घ्यावी. आम्हाला निधीही देत राहावा. आम्हाला निधी देण्याबाबतही मुख्यमंत्र्यांनी नेहमीच अशी माझी काळजी घ्यावी".
विरोधी पक्षनेतेपदावर बोलताना ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या सहमतीने माझे नाव विरोधी पक्षनेतेपदासाठी पुढे आले आहे. विरोधी पक्षनेतेपदाच्या निवडीसाठी सभागृहातील सदस्यसंख्येची १० टक्क्यांची अट असणे हे चुकीचे आहे. याबाबत मी सचिवांकडून माहिती घेतली असून, घटनेतही तशी तरतूद नाही. सभागृहातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाला हे पद देण्याची जबाबदारी विधानसभा अध्यक्ष आणि सचिवांची आहे. सरकारने यासाठी पुढाकार घ्यावा," अशी मागणीही त्यांनी केली.
नारायण राणे यांना आता मनसेचा पुळका येत असेलही;पण मनसे नेते प्रकाश महाजन यांनी त्यांच्यावर केलेली टीका पाहा.आता राणे यांनी इतरांची काळजी करण्यापेक्षा आपण स्वतः एवढे पक्ष का सोडले याचे उत्तर द्यावे, असा सवाल करत नारायण राणे आणि त्यांच्या मुलांची चोच नेहमी नरकातच असते. राणेंच्या मुलाने माझ्या टीकेला कोणत्या भाषेत उत्तर दिले हे सर्वांनी पाहिले आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर गेली दहा वर्षे सातत्याने टीका करणाऱ्या राणे यांना आता दोन ठाकरे बंधू एकत्र येत असल्याने भीती वाटत. राणे कुटुंबीयांबद्दल मला यापुढे कोणतेही प्रश्न विचारू नका," असेही भास्कर जाधव यांनी केला.