Balasaheb Thackeray
मुंबई : हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. त्यांची भाषणे आजही लाखो शिवसैनीक आणि मराठी माणून ऐकत असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांचा प्रभाव आहे. बाळासाहेबांच्या १०० व्या जयंतीनिमित्त मोदींनी "बाळासाहेब म्हणजे तीक्ष्ण बुद्धिमत्ता, प्रभावी वक्तृत्व आणि ठाम विचारसरणी" अशा शब्दात आदरांजली वाहिली. पाहा बाळासाहेब ठाकरे यांची गाजलेली भाषणे.
बाळासाहेब ठाकरेंच्या मते, त्यांच्या वडिलांनी त्यांना आत्मबळ आणि आत्मविश्वासाचा मंत्र दिला होता. शिवसैनिकांची ताकद हीच त्यांची खरी ताकद आहे; शिवसैनिकांशिवाय ते स्वतःला शिवसेना प्रमुख मानू शकत नाहीत, असे ते भाषणात म्हणायचे.
मुंबईत मराठी माणसाचा कणा ताठ करण्याचे काम शिवसेनेने केले आहे. जर शिवसेना नसती, तर मराठी माणूस मुंबईतून फेकला गेला असता, असे ते नमूद करत. जे आमदार किंवा खासदार शिवसेनेच्या तिकिटावर निवडून येऊन नंतर पक्षाशी गद्दारी करतात, त्यांना त्यांनी कडक इशारा दिला होता. अशा लोकांना रस्त्यावर उतरून धडा शिकवला पाहिजे, असे त्यांचे स्पष्ट मत होते.
मराठी तरुणांनी केवळ नोकऱ्या मागण्यापेक्षा 'नोकऱ्या देणारे' बनावे, अशी त्यांची इच्छा होती. मुंबईला सिंगापूर, मलेशिया किंवा हाँगकाँगसारखे सुंदर बनवण्याची त्यांची महत्त्वाकांक्षा होती, मात्र कचऱ्याच्या समस्येबद्दल त्यांनी नागरिकांनाही जबाबदारी घेण्याचे आवाहन केले होते.
हिंदुस्तान हे 'हिंदू राष्ट्र'च आहे आणि त्यासाठी कोणाच्या परवानगीची गरज नाही, असे ते म्हणत. त्यांनी गांधी घराण्याच्या नावाच्या इतिहासावर टीका केली होती नेहरूंच्या धोरणांमुळेच काश्मीरचा प्रश्न धगधगत राहिला, असा आरोप त्यांनी केला होता.