Mumbai Politics pudhari Photo
मुंबई

Mumbai Politics: आशिष शेलारांच्या वक्तव्यावर बाळा नांदगावकरांचे प्रत्युत्तर, म्हणाले...

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : "आजच्या तारखेला भारतात आशिष शेलार एक नंबरचे वक्ते आहेत. त्यांना त्यांचे मत मांडण्याचा अधिकार आहे. पण विजयी मेळावा महत्त्वाचा होता म्हणूनच त्यांनी यावर मत व्यक्त केले. ठाकरे बंधू आता एकत्र आले आहेत, पुढची दिशा लवकरच स्पष्ट करू, असे सूचक विधान आशिष शेलार यांच्या टीकेवर मनसे नेते बाळा नांदगावर यांनी केले. ते आज मुंबईत (दि.६) माध्यमांशी बोलत होते.

अशक्य ते शक्य करतील स्वामी...; बाळा नांदगावर

पुढे बोलताना नांदगावकर म्हणाले की, ठाकरे परिवाराने जसे आज कार्यकर्त्याना दिलंय. तसे बाळासाहेब यांनी भाजपाला पण भरभरून दिलंय. त्यांची इच्छा होती की, संपूर्ण परिवार एकत्र यावा. यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न केले. परंतु जे अशक्य ते शक्य करतील स्वामी हे समर्थ्यांचे वाक्य आहे, याप्रमाणेच सर्व गोष्टी घडल्याचे देखील मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

भाजप नेते ठाकरे बंधूंवर नेमकं काय म्हणाले 

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या युतीवर बोलताना म्हटले आहे की, "दोघांच्याही भाषणात अप्रामाणिकपणा होता. उद्धव यांच्या भाषणात तडफड दिसत होती. दोघांनीही देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानायला पाहिजे होते. मेळाव्यातील 'म' हा महानरपालिकेचा असल्याची टीका देखील शेलार यांनी यावेळी बोलताना केली".

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT