Navi Mumbai Municipal Coropration Pudhari
मुंबई

Bajrang Dal Protest Navi Mumbai | गोमांस खाण्याच्या सल्ल्याविरोधात बजरंग दलाचे नवी मुंबई महापालिकेसमोर आंदोलन

संबंधित प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी

पुढारी वृत्तसेवा

Navi Mumbai Municipal Corporation Protest

नवी मुंबई : गोमांस खाण्याचा सल्ला देण्यात आल्याच्या कथित प्रकरणाविरोधात बजरंग दलाने शुक्रवारी (दि. १९) नवी मुंबई महानगरपालिका सभागृहाबाहेर जोरदार आंदोलन केले. संबंधित प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून त्यांना तत्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी आंदोलकांनी केली.

बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, या प्रकरणाबाबत त्यांनी यापूर्वीच महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली होती. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याने आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी म्हटले.

राज्यात गोवंश हत्येबाबत कठोर कायदा असून त्यासाठी शिक्षेची तरतूद आहे. अशा परिस्थितीत गोमांस खाण्याचा सल्ला कसा दिला जाऊ शकतो, असा सवाल बजरंग दलाने उपस्थित केला.

संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून दोषींवर तातडीने शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणीही आंदोलकांनी केली. दरम्यान, आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महापालिका परिसरात पोलिस बंदोबस्त वाढविण्यात आला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT