Ashwini Bhide pudhari photo
मुंबई

Ashwini Bhide WhatsApp Hack: महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे व्हाॅट्सॲप हॅक; आता पुन्हा रीस्टोअर

अश्विनी भिडे यांनी एक्स पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांचे व्हॉट्‌सॲप अकाउंट काही काळासाठी हॅक झाले होते. मात्र, आता ते पुन्हा रीस्टोअर करण्यात आले आहे. अश्विनी भिडे यांनी एक्स पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली.

काही काळासाठी अकाउंट हॅक झाल्याने त्यांच्या व्हॉट्‌स ॲपवरून आलेल्या मेसेजवर नागरिकांनी विश्वास ठेवू नये, विशेषतः मदत किंवा पैशांची मागणी करणाऱ्या मेसेजकडे दुर्लक्ष करावे, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी त्यांनी सांगितले की, त्यांचे व्हॉट्सॲप खाते हॅक झाल्यानंतर सायबर फसवणूक करणारे त्यांच्या नावाचा वापर करून लोकांशी संपर्क साधत आहेत. त्यामुळे, त्यांनी लोकांना त्यांच्या नावाने येणाऱ्या संशयास्पद संदेशांना प्रतिसाद न देण्याचा आणि कोणतेही पेमेंट न करण्याचा सल्ला दिला आहे.

सायबर फसवणुकीच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडली आहे. अलीकडेच, 'महाराष्ट्राची हास्य यात्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात यांचे व्हॉट्सॲप खातेही हॅक झाले होते. त्यांनी या घटनेबद्दल लोकांना माहिती देण्यासाठी एक व्हिडिओ प्रसिद्ध केला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT