Anjali Damania On Parth Pawar pudhari photo
मुंबई

Anjali Damania On Parth Pawar: पार्थ पवारला क्लीन चीट मिळूच शकत नाही.... 'तो' कागद दाखवत दमानियांचा थेट चौकशी समितीलाच इशारा

Anirudha Sankpal

Anjali Damania Parth Pawar Land Scam: पुण्यातील मुंढवा जमीन व्यवहार घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांना क्लीन चीट मिळणार असल्याची शक्यता वर्तवणाऱ्या बातम्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत. लवकरच खारगे समिती आपला चौकशी अहवाल हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं सुपूर्द करणार आहे.

दरम्यन, पार्थ पवार यांना क्लीन चीट मिळणार हे वृत्त येताच सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आज पत्रकार परिषद घेऊन पार्थ पवार यांना क्लीन चीट मिळूच शकत नाही असा दावा केला. त्यांनी पत्रकार परिषदेवेळी पार्थ पवार आणि शीतल तेजवानी यांच्यात झालेली पॉवर ऑफ अटर्नी देखील दाखवली. याचबरोबर त्यांनी चौकशी समितीला देखील इशारा दिला.

अंजली दमानिया म्हणाल्या, 'पार्थ पवारचं नाव चार्जशीटमध्ये नाही असं होऊच शकत नाही. ती चार्जशीट ही शीतल तेजवानीला जामीन मिळू नये यासाठी होती. मी एक पूर्ण प्रिंटआऊट काढलं आहे. पार्थ पवार यांनी पॉवर ऑफ अटर्नी शितल तेजवानी आणि पार्थ पवार यांच्यात हा झाला होता. याच्यात प्रत्येक पानावर त्यांचे नाव आहे. इतकंच नाही तर पार्थ पवारचा फोटो, शिक्का त्यावर त्यांची सही खाली विटनेसची सही आहे.'

दमानिया पुढे म्हणाल्या, 'याच जमिनीचा व्यवहार हा पार्थ पवार यांनी शीतल तेजवानी सोबत केला होता. याची कॉपी मी खारगे समितीला दिली आहे. त्यामुळं खारगे समिती त्यांना याच्यातून क्लीन चीट देऊच शकत नाही आणि जर त्यांनी पार्थ पवार यांना बाहेर काढलं, तर मी खारगे समितीला धारेवर धरणार आहे. मी उच्च न्यायालयापर्यंत लढा देणार.'

आज पत्रकार परिषद घेण्याचं कारण देखील दमानिया यांनी सांगितलं. त्यांनी या सर्व गोष्टी महाराष्ट्रासमोर यायला हव्यात म्हणून मी बोलले. कोणत्याही परिस्थितीत मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणातून पार्थ पवार बाहेर येऊ शकणार नाही. जर अहवाल मॅनेज केला तरी उच्च न्यायालयात जाऊन जे खरं आहे ते त्यांच्यासमोर मांडणार आहे.माझा लढा मी चालूच ठेवणार आहे. असं वक्तव्य केलं आहे.

तसेच कोणीतरी खोट्या बातम्या पेरत असल्याचं देखील म्हटलं. अंजली दमानिया या बारामतीला जाऊन धापट्टीची पाहणी करणार आहेत असा देखील अनेक वृत्तात दावा करण्यात आला आहे तो दावा खोटा असल्याचं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT