मुंबई

Amruta Fadnavis : अमृता फडणवीस यांनी विद्या चव्हाण यांना पाठवली अब्रुनुकसानीची नोटीस

अमृता चौगुले

मुंबई; पुढारी ऑनलाईन : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी राष्ट्रवादीच्या नेत्या विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीसच बजावली. त्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्यावर भाजपच्या आयटीसेल प्रमुखाने केलेल्या विधानाचा समाचार घेत विद्या चव्हाण यांनी अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांना डान्सिंग डॉल म्हणत त्यांच्यावर शेलक्या शद्बात टीका केली. या टिकेनंतर भडकलेल्या अमृता फडणवीस  यांनी विद्या चव्हाण यांना अब्रुनुकसानीची नोटीस पाठवली. अगदी वेगळ्या आणि काव्यात्मक शैलीत ट्वीट करत अमृता फडणवीस यांनी ही माहिती ट्वीटर द्वारे दिली.

या ट्वीटमध्ये अमृता फडणवीस (amruta fadnavis) यांनी विद्या चव्हाण यांना आपल्याच सुनेचा आणि पुरोगामी स्त्रियांचा अपमान करणारी अशी बोचरी टिका केली आहे. तसेच तुम्ही पसरवलेली विषारी घाण कोर्टात जाऊनच साफ करावी असे देखिल लिहले आहे. अमृता फडणवीस यांच्या या ट्वीटमुळे पुन्हा एकदा राजकीय क्षेत्रात वादळ उठले आहे. यामुळे राष्ट्रवादी – शिवसेना आणि भाजप यांच्या नेत्यांमध्ये आता चांगलेच जुंपल्याचे चित्र आहे.

नेमके काय घडलं ( amruta fadnavis )

भाजपचा आयटीसेलच्या जितेन गजारिया याने रश्मी ठाकरे यांना राबडीदेवी असे संबोधले. यावरुन शिवसेनेने निषेध नोंदवून गजारियाला अटक करण्याची मागणी केली. दरम्यान जितेन याला अटक देखिल करण्यात आली. हाच धागा पकडत विद्या चव्हाण यांनी फडणवीस यांच्यावर टीका केली.

विद्या चव्हाण म्हणाल्या की, रश्मी ठाकरे यांना बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांची उपमा दिली हे एका अर्थाने बरच झालं. रश्मी ठाकरे या नशिबवान आहेत, त्या घरदार, चूलमूल सांभाळणारी संसारिक स्त्री आहेत. त्यांना बिहारच्या मुख्यमंत्री होण्याचे भाग्य तरी मिळाले. बरे झाले देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नीची उपमा दिली नाही. नाहीतर नुसती डान्सिंग डॉल अशी लोकांच्या समोर प्रतिमा निर्माण झाली असती. रश्मी ठाकरे यांची प्रतिमा लोकांच्यामध्ये चांगली असल्याचे विद्या चव्हाण म्हणाल्या.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT