Amol Mitkari pudhari photo
मुंबई

Amol Mitkari: जरा 'दमा'न!मालकाकडून जास्त पगार मिळावा म्हणून... ; अमोल मिटकरींचं दमानियांवर बोचरी पोस्ट

Anirudha Sankpal

Amol Mitkari take a dig on Anjali Damania:

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी नुकतेच पत्रकार परिषद घेऊन कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अमोल मिटकरी यांनी अंजली दमानिया यांच्यावर ट्विट करून बोचऱ्या शब्दात टीका केली. अमोल मिटकरींना पक्षानं प्रवक्ते पदावरून हटवत मोठा धक्का दिला होता. त्यानंतर त्यांच्या या ट्विटची चर्चा सुरू आहे.

अमोल मिटकरी यांनी, 'जरा 'दमा'न!मालकाकडून जास्त पगार मिळावा म्हणून मागील अनेक महिन्यांपासून अजितदादा आणि पार्थ पवारांवर खूप अभ्यास करावा लागला. इतकाच अभ्यास UPSC साठी केला असता तर आज ही बिनबुडाचे आरोप करणारी 'सुपारीबाज समाजसेवा' आपल्या हातून घडली नसती. गोळ्या वेळेवर घेत चला. मेंदुची काळजी घ्या.' असे ट्विट केलं.

दरम्यान, आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेऊन पुणे जमीन कोरेगाव पार्क जमीन घोटाळा प्रकरणी अजित पवार यांच्यावर आरोप करत पार्थ पवार यांच्यावर तातडीनं गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.

त्यांनी पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणात व्यवहार रद्द करण्याचा प्रयत्न करणं हे बेकायदेशीर असून या फ्रॉडसाठी पार्थ अजित पवार यांची कंपनी अमेडिया आणि खुद्द पार्थ पवार यांचा एफआयआरमध्ये समावेश करावा अशी मागणी केली. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आपल्या पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील करण्यात आली आहे.

अंजली दमानिया म्हणाल्या की, या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा कायदेशीर मुद्दा म्हणजे जमिनीच्या विक्रीसाठी वापरलेला पॉवर ऑफ अटर्नी (PoA) दस्तऐवज हा नोंदणीकृत (Registered) नव्हता. कायद्यानुसार, विक्रीच्या व्यवहारावर सही करण्यासाठी PoA नोंदणीकृत असणे आवश्यक आहे.

शीतल तेजवानी यांना गायकवाड कुटुंबाकडून मिळालेल्या PoA मध्ये खरेदी-विक्रीच्या व्यवहारावर सही करण्याचा अधिकार नव्हता; त्यांना केवळ वकिलांना नेमणे, सरकारी कार्यालयात प्रतिनिधित्व करणे, कोर्टात केसेस दाखल करणे यासारखे अधिकार होते. असंही अंजली दमानिया यांनी सांगितलं.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT