Amitabh Bachchan Threat pudhari photo
मुंबई

Amitabh Bachchan Threat : बच्चनना धमकी देणारा ढिल्लन तर भुरटा चोर

‘पब्लिसिटी स्टंटबाज’; बिष्‍णोई गँगच्या सहकाऱ्यांचे आरोप

पुढारी वृत्तसेवा

मुंबई / चंदीगड : बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन यांना गोल्डी ढिल्लन याने दिलेल्या कथित धमकीनंतर आता गुन्हेगारी विश्वातच अंतर्गत वाद उफाळून आला आहे. लखनौ-चंदीगडमधील लॉरेन्स बिश्नोई टोळीचे कथित सहकारी मन्ना ब्रॅम्प्टन आणि मनदीप स्पेन यांनी मंगळवारी सोशल मीडियावर एक निवेदन जारी करून ढिल्लन हा भुरटा चोर असल्याचे सांगत त्याची धमकी हा केवळ 'पब्लिसिटी स्टंट' असल्याचे म्हटले आहे.

मन्ना आणि मनदीप यांनी ढिल्लनच्या गुन्हेगारी क्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. गोल्डी ढिल्लन पूर्वी जर्मनीतील एका रेस्टॉरंटमध्ये भांडी घासून उदरनिर्वाह करत होता. तो पंजाबमधील केवळ 'चिट्टा' (हेरॉईन) तस्करी आणि केबल वायर चोरी करणारा किरकोळ गुन्हेगार आहे. अमिताभ बच्चन किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांना इजा पोहोचवण्याची त्याची औकात नाही, असा दावा त्यांनी केला.

१९८४ च्या शीख विरोधी दंगलीचा बदला घेण्यासाठी बच्चन यांना धमकी दिल्याचा ढिल्लनचा दावाही या दोघांनी फेटाळून लावला. जानेवारी महिन्यात जर्मनीत ढिल्लनवर हल्ला केला असता, मोठ्या शस्त्रांच्या गप्पा मारणाऱ्या ढिल्लनकडे केवळ एक चाकू होता आणि तो कसाबसा जीव वाचवून पळून गेला, असेही त्यांनी नमूद केले. अमृतसरमधील इन्फ्लुएन्सर मधू संधूच्या हत्येत त्याचा सहभाग असून, तो आपल्याच सहकाऱ्यांची माहिती पोलिसांना देणारा 'खबरी' असल्याचा खळबळजनक आरोपही केला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT