Ajit Pawar Plane Crash Investigation 28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान लॅडींग करताना झालेल्या अपघात महाराष्ट्राचे तत्कालिन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मृत्यू झाला होता. आता गेले महिनाभर या अपघाताची डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी तपास सुरु केला होता. आज हा अहवाला डीजीसीएने सादर केलाआहे. यामध्ये विमान अपघाताची प्रमूख तिन कारणे दिली आहेत. यावेळी डीसीजीएने हा अपघात एकाच कारणामुळे नव्हे, तर हवामान + पायाभूत सुविधा + ऑपरेशनल निर्णय यांच्या संयोगामुळे घडल्याची शक्यता व्यक्त केली आहे तसेच अंतिम कारणे CVR/FDR सविस्तर विश्लेषणानंतर स्पष्ट होतील असेही नमूद केले आहे.
DGCA चे विश्लेषण अपघातावरील प्राथमिक अहवालावर आधारित
डिजीसीएने ने अपघाताचा अहवाल सादर केला असून हा अहवाल प्राथमिक माहितीवर आधारीत आहे असे त्यांनी स्पष्ट केले आहे. यामध्ये त्यांनी अपघाताची प्रमुख तीन कारणे सांगितली आहेत. हा अहवाल निष्कर्षात्मक नसून, अपघाताची कारणे समजून घेण्यासाठी उपलब्ध तथ्यांचे विश्लेषण मांडतो. असेही स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी मांडलेली प्रमुख तीन कारणे
१ हवामान व दृश्यमानता या अपघातातील महत्त्वाचा घटक
अहवालात म्हटले आहे की बारामती येथे स्वतंत्र MET (हवामान) सुविधा नाही. टॉवरने दृश्यमानता ~3000 मीटर सांगितली; परंतु VFR ऑपरेशन्ससाठी किमान 5000 मीटर आवश्यक असते. अपघातावेळी पूणे/मुंबई METAR मध्ये धुके/धूर (BR/FU) नोंदलेले. तसेच INSAT-3DR उपग्रह निरीक्षणानुसार बारामती परिसरात पातळ धुके असण्याची शक्यता. व्यक्त केली आहे यामध्ये त्यांनी म्हटले आहेकी VFR मर्यादेपेक्षा कमी दृश्यमानतेत लँडिंगचा प्रयत्न हा मोठा जोखीम घटक ठरतो.
२ बारामती विमानतळावर एअरफिल्ड (Baramati) मर्यादा
बाराममी विमातळावर अनकंट्रोल्ड एअरफिल्ड – ILS/VOR/NDB नाहीत फक्त फक्त VFR ऑपरेशन्स अनुमती. तसेच रनवेवर मार्किंग फिकट झाले आहेत व खडीही सैल झाली आहे तसेच हा ११ क्रंमाकाचा रनवे हा टेबल टॉप आहे यामध्ये एक टोक उतारावर असते. तसेच याठिकाणी पुरेशी कुंपण/सीमा भिंत नाही, ARFF (फायर-रेस्क्यू) इन-हाउस नाही विंडसॉक RWY-11 बाजूला नाही. असे सांगून याचे त्यानी विश्लेष असे केले आहे की : VIP/चार्टर जेटसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुरक्षा व नेव्हिगेशन सहाय्ये अपुरी.
३ उड्डाण क्रम व मानवी घटक कारणीभूत
डीजीजीने म्हटले आहे की विमान उतरवताना पहिल्या अप्रोचमध्ये Go-Around दृश्यमानता अपुरी होती. दुसऱ्या अप्रोचमध्ये “Field in sight” रिपोर्ट केल्यानंतर लँडिंग क्लिअरन्स मिळाला. तर शेवटच्या चा रेडिओ कॉल: “Oh St… Oh St…” म्हणजे तात्काळ नियंत्रण गमावल्याचा संकेत होता त्यानंतर विमान रनवे -11 च्या डावीकडे 50 मीटर अंतरावर झाडांवर आदळून खाली कोसळले. याचे विश्लेषण त्यांनी Low visibility + visual illusions + tabletop runway यांचा एकत्रित परिणाम संभवतो. असे म्हटले आहे.
या अहवालातील काही ठळक मुद्दे
VFR मर्यादेपेक्षा कमी दृश्यमानतेत लँडिंगचा प्रयत्न हा मोठा जोखीम घटक ठरतो.
VIP/चार्टर जेटसाठी आवश्यक असलेली मूलभूत सुरक्षा व नेव्हिगेशन सहाय्ये अपुरी.
Low visibility + visual illusions + tabletop runway यांचा एकत्रित परिणाम संभवतो.
थकवा/दारूचा थेट पुरावा नाही; परिस्थितीजन्य दबाव (VIP, हवामान, अनकंट्रोल्ड फील्ड) महत्त्वाचा.
आत्तापर्यंत तांत्रिक बिघाडाचा थेट पुरावा नाही; CVR/FDR विश्लेषण निर्णायक ठरेल.
अपघाताची कारणे संक्षिप्त स्वरुपात
1. VFR minima पेक्षा कमी दृश्यमानता.
2.अनकंट्रोल्ड एअरफिल्डची अपुरी पायाभूत सुविधा.
3.टेबल-टॉप रनवे + फिकट मार्किंग.
4.मानवी घटक/दृश्य भ्रम (visual illusion).
5.MET माहितीची मर्यादित अचूकता.
तपासाची दिशा सध्या काय आहे?
1 SSFDR मधील डेटा डाउनलोड करण्यात आला असून त्याचे विश्लेषण सुरू आहे.
2 SSCVR मधील डेटा ICAO Annex 13 मधील मानके व शिफारस केलेल्या पद्धतीनुसार नॅशनल ट्रान्सपोर्ट सेफ्टी बोर्ड (NTSB) यांच्या सहाय्याने डाउनलोड करण्यात येणार आहे.
3 ऑपरेटरचे कर्मचारी व इतर संबंधित व्यक्तींची प्रारंभिक विधाने गोळा करण्यात आली असून ती इतर उपलब्ध पुराव्यांसह तपासली जात आहेत.
4 गोळा केलेले पुरावे पुढील कार्यवाहीसाठी विश्लेषित केले जात आहेत.
5 विमानाचा अवशेष (wreckage) सविस्तर तपासणीसाठी सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आला आहे.
6 अपघातस्थळी अवशेषांची तपासणी करण्यात आली असून, त्यातील निष्कर्ष पुढील विश्लेषणासाठी नोंदविण्यात आले आहेत.
7 विमानाची उड्डाणयोग्यता (airworthiness), ऑपरेशन्स, फ्लाइट सेफ्टी तसेच विमानाशी संबंधित कागदपत्रे पुढील सखोल तपासणी व विश्लेषणासाठी जप्त करण्यात आली आहेत.
8 अमेरिकेतील NTSB यांनी ICAO Annex 13 च्या आवश्यकतांनुसार तपासात सहभागी होण्यासाठी आणि सहाय्य करण्यासाठी अधिकृत प्रतिनिधी (Accredited Representative) तसेच तांत्रिक सल्लागारांची नियुक्ती केली आहे.
9 इतर संबंधित भागधारकांकडून मिळालेली नोंदी/माहिती सध्या तपासली जात आहे.
10 अपघाताशी संबंधित सर्व पैलूंची तपासणी व चौकशी करून अपघातास कारणीभूत ठरलेली तथ्ये, मूळ कारणे (root causes) आणि योगदान देणारे घटक (contributory factors) स्पष्ट करण्यात येतील.