Ajit Pawar Plane Crash VSR Ventures Pvt Ltd Pudhari
मुंबई

Ajit Pawar Plane Crash: 'हे तर सराईत गुन्हेगार...'; VSR Aviation बाबत पत्रकाराची पोस्ट, कंपनीचा मालक कोण?

SUHEL SETH X POST: वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक खळबजनक दावा करणारी पोस्ट X वर केली आहे.

Anirudha Sankpal

Ajit Pawar Plane Crash VSR Aviation

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आज सकाळी (दि. २८ जानेवारी) विमान अपघातात निधन झालं. मुंबईवरून बारामती इथं येत असताना बारामती विमानतळावार लँडिंगच्यावेळीच अजित पवारांच्या विमानाला भीषण अपघात झाला. त्यात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

विमान कंपनीकडे बोट

विमान लँडिंगला अवघे काही मिनिट शिल्लक असताना हा अपघात झाल्यामुळं या अपघाताविषयी एक संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, वरिष्ठ पत्रकार सुहेल सेठ यांनी एक खळबजनक दावा करणारी पोस्ट X वर केली आहे. त्यांनी या अपघाताबाबत विमान कंपनी VSR कडे बोट दाखवलं आहे.

दुसरे विमान झाले क्रॅश

सुहेल सेठ आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, 'आज सकाळी जो विमान अपघात झाला ते विमान VSR Aviation च्या मालकीचं होतं. ते सराईत गुन्हेगार आहेत. त्यांचे हे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. पिता-पुत्र ही कंपनी चालवतात. ते लोकांना DGCAIndia हे आमच्या खिशात आहे असं लोकांना सांगत फिरत असतात. ही चार्टर कंपनी बंद केली पाहिजे.'

आता तरी जागे व्हा

दरम्यान, सुहेल सेठ यांच्यानंतर तेहसीन पुनावाला यांनी देखील ट्विट केलं, 'अजित पवार ज्या विमानातून प्रवास करत होते. ते विमान VSR Aviation चे होते. हे त्या कंपनीचे दुसरे विमान क्रॅश झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतात अनेक विमाने आणि हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहेत. DGCA ने आता तरी यात लक्ष घालून कडक पावलं उचालावीत. ओम शांती!'

या अपघातात अजित पवार यांच्यासह पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यात अजित पवार, मुंबई पीएसओ HC विदीप जाधव, पायलट कॅप्टन सुमित कपूर, कॅप्टन संभवी पाठक, फ्लाईट अटेंडंट पिंकी माळी यांचा समावेश होता.

VSR Aviation चा तीन वर्षातला दुसरा मोठा अपघात

VSR Aviation कंपनीच्या विमानाचा हा गेल्या तीन वर्षातील दुसरा मोठा अपघात आहे. यापूर्वी 14 सप्टेंबर 2023 रोजी मुंबई विमानतळावर विशाखापट्टणम येथून आलेल्या विमानाचं लँडिग दरम्यान अपघात झाला होता. पावसामुळे विमान धावपट्टीवरुन घसरल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले होते. या विमानात सहा जण होते. यातील सहवैमानिक गंभीर जखमी झाला होता.

VSR Aviation कंपनीचा मालक कोण?

अपघातग्रस्त विमान  Learjet 45 असून विमानाची मालकी VSR Ventures Pvt Ltd कंपनीची आहे. कंपनीच्या संकेतस्थळावरील माहितीनुसार कंपनीचे मुख्यालय दिल्ली असून मुंबई, भोपाळ, हैदराबाद येथेही कंपनीची कार्यालये आहेत. विजय कुमार सिंह हे कंपनीचे मालक आहे.

15 वर्षांपासून कार्यरत

VSR Ventures Pvt Ltd ही कंपनी 15 वर्षांपासून हवाई वाहतूक क्षेत्रात कार्यरत असून कंपनीत किमान 60 वैमानिक आहेत. VSR व्हेन्चर्सतर्फे खासगी कंपन्यांमधील बडे अधिकारी, उद्योजक यांना विमान सेवा पुरवली जाते. कंपनीची वेबसाईट दुपारी 12 वाजल्यापासून बंद आहे.

महिपालपूर येथे अधिकाऱ्यांचे पथक

अजित पवारांच्या विमानाचे अपघात झाल्यानंतर विमान अपघात अन्वेषण विभागातील (Aircraft Accident Investigation Bureau- AAIB)  दोन अधिकारी चौकशीसाठी VSR Ventures च्या दिल्लीतील महिपालपूर येथील कार्यालयात पोहोचले. सकाळी साडे अकराच्या सुमारास अधिकारी कार्यालयात पोहोचले. कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ सुरक्षा रक्षकाची अधिकाऱ्यांनी चौकशी केली. अधिकाऱ्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले त्यावेळी तीन ते चार कर्मचारी कार्यालयाच्या खाली घुटमळत होते. मात्र, अधिकाऱ्यांना पाहताच सर्व कर्मचारी निघून गेले, असे वृत्त 'इंडियन एक्स्प्रेस'ने दिले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT