Ajit Pawar Plane Crash Pudhari
मुंबई

Ajit Pawar Plane Crash: अजित पवार विमान दुर्घटनेची सीबीआय चौकशीची मागणी; राष्ट्रवादी शिष्टमंडळाची मुख्यमंत्र्यांकडे धाव

सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर; अमित शाह यांच्याकडे पत्रव्यवहार करण्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पुढारी वृत्तसेवा

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला 28 जानेवारी रोजी बारामती येथे अपघात झाला. या अपघातात अजित पवार यांच्यासह पाचजण मृत्युमुखी पडले. या भीषण अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने मंगळवारी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देत विमान अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत करण्याची मागणी केली. यावेळी मंत्री हसन मुश्रीफ व युवा नेते पार्थ पवार यांनी उपस्थित होते. ही माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणाबाबत बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे राज्य सरकारकडून पत्रव्यवहार केला जाईल. तसेच अपघाताची चौकशी सीबीआयमार्फत केली जाईल, अशी ग्वाही दिल्याचे खा. तटकरे यांनी सांगितले.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सीआयडीमार्फत चौकशी करण्याचे आदेश दिलेले आहेत. स्वायत्त यंत्रणा तपास करत आहेत पण सीबीआय तपास करत असताना आणखी व्यापकतेने तपास होऊ शकतो. असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT