मुंबई

Sanjay Raut | "अजित पवारांना जिवाभावाचे मित्र म्हणता; मग..." संजय राऊतांनी मुख्यमंत्र्यांकडे कोणती मागणी केली?

सुनेत्रा पवार प्रचंड मतांनी निवडून येणार हे सांगण्यासाठी भविष्यकाराची गरज नाही

पुढारी वृत्तसेवा

Sanjay Raut Challenges CM to File FIR in Ajit Pawar Plane Accident Case

मुंबई : अजित पवार विमान अपघात प्रकरणी गुन्हा दाखल व्हावा, हीच काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची प्रमुख मागणी आहे. आता ही मागणी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही करावी. या मागण्यांचा विचार केला तर महाराष्ट्रावर उपकार होतील. तुम्ही गुन्हा दाखल करण्यापासून का पळताय? अजित पवारांना तुम्ही जिवाभावाचे मित्र म्हणता. मोठा भाऊ तुम्ही स्वतःला म्हणता तर लहान भावाच्या अपघाताची चौकशी करा, असे आव्हान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना केले. सगळ्या बारामती निवडणुकीत आम्ही कुठे आहोत?, असा सवाल करत सुनेत्रा पवार या प्रचंड मतांनी निवडून येतील, यासाठी भविष्यकाराची सांगण्याची गरज नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रातील भोंदू बाबा आणि बुवा हे भाजप प्रचारक

महाराष्ट्रातील भोंदू बाबा आणि बुवा हे भाजप प्रचारक आहेत. खरात बाबा मुस्लिम होता का? एरंडे हा मौलवी होता का?, असा सवाल करत अशाप्रकारे नीच कृत्य करणाऱ्याला धर्म नसतो. अन्य धर्माचा कोणी आला की भाजप रस्त्यावर उतरणार, असा टोलाही त्यांनी लगावला.

शर्मिला ठाकरे बोलतायत ते बरोबर

महिला आरक्षण देणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार होते. याचे श्रेय महाराष्ट्राला जाते. सगळ्यांनी महिलांनी आपली सुरक्षा, जाणीव समोरचा माणूस काय दृष्टीने बघतोय हे समजते, असे शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यांचे म्हणणं बरोबर आहे. सुशिक्षित महिलांना तर भान असायला हवं, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सीमा भागातील मराठी माणसाकडे सरकारचे दुर्लक्ष

बेळगावमध्ये आम्ही अनेकदा आंदोलन केलं आहे. सीमा विभाग हा आपल्या राज्यात आहे. एकही मंत्री त्याठिकाणी जाऊन मराठी माणसाची काय अवस्था आहे ते पाहत नाही. मराठी माणसावर अन्याय होतोय, त्यासाठी बेळगावला जावं लागेल.

निवडणूक आयोगाने भाजपचा झेंडा फडकवा

निवडणूक आयोगाने भाजपचा झेंडा फडकवा. भाजपने सुद्धा जाहीरनाम्यात सांगावं, निवडणूक आयोग ही अंगीकृत आपल्या पक्षाची संघटना आहे, असा टोलाही संजय राऊतांनी लगावला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT