नवाब मलिक विधानसभा निवडणूक लढविण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम राहिले आहेत.  file photo
मुंबई

उमेदवारीचा विरोध झुगारून नवाब मलिक रिंगणात

Maharashtra Assembly Polls | Nawab Malik| मानखुर्द शिवाजीनगरमधून निवडणूक लढवणार

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांना पक्षाने अगदी शेवटच्या क्षणी एबी फॉर्म दिला. यानंतर मलिक यांनी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. दरम्यान त्यांच्या उमेदवारीला भाजपने विरोध केला होता. परंतु, मलिक निवडणूक लढविण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम होते. आज (दि.४) अर्ज माघारीच्या दिवशी त्यांनी भाजपचा विरोध झुगारून आपली उमेदवारी कायम ठेवली आहे. आता भाजप कोणतीही भूमिका घेते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, नवाब मलिक यांनी ANI ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, मी निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट होताच शिवसेना आणि भाजप दोघेही विरोध करतील हे स्पष्ट होते. पण ज्याप्रकारे पक्षाने माझ्यावर शेवटच्या क्षणी विश्वास दाखवला, एबी फॉर्म पाठवला आणि मला पक्षाचा उमेदवार बनवले. यामुळे मी पूर्ण ताकदीने निवडणूक लढविण्याचे ठरवले होते.

अखेरच्या क्षणी पक्षाने मलिक यांना दिला AB फॉर्म

नवाब मलिक यांनी आपल्याला विरोध झाला तरी आपण निवडणूक भरणार असल्याचे म्हटले होते. मंगळवारी (दि.२९) उमेदवारी अर्ज भरल्यानंतर त्यानी म्हटले होते की, "मी मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचा उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. मी अपक्ष उमेदवार म्हणूनही फॉर्म भरला होता. पण पक्षाने अखेरच्या क्षणी मंगळवारी (दि.२९) दुपारी २.५५ वाजता एबी फॉर्म पाठवला आणि आम्ही तो सादर केला. आता मी राष्ट्रवादीचा अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी सांगितले होते.

दरम्यान, नवाब मलिक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असल्याने महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपकडून त्यांच्या उमेदवारीला विरोध सुरु होता. या पार्श्वभूमीवर नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, नवाब मलिकांच्या उमेदवारीबाबत पक्षाची भूमिका स्पष्ट केली. मानखुर्द शिवाजीनगर येथील उमेदवार नवाब मलिक यांच्याबाबत विचारले असता, अजित पवार म्हणाले होते, "४ नोव्हेंबरपर्यंत कोण कोणत्या जागेवरून निवडणूक लढवणार हे स्पष्ट होईल." याआधी गुरुवारी मुंबई भाजपचे प्रमुख आशिष शेलार यांनी, "अजित पवार यांनी नवाब मलिक यांना तिकीट द्यायला नको होते.'' असे म्हटले होते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT