मुंबई : एअर इंडियाचे मुंबईहून लंडनला जाणारे विमान अर्ध्यातून माघारी फिरवण्यात आले. यामागे कारण काय हे मात्र अद्याप समोर आलेले नाही. फ्लाईटरडार २४ नुसार, एअर इंडियाचे विमान एएल-१२९ ने आज सकाळीच मुंबईहून लंडनला जाण्यासाठी उड्डाण केले होते. मात्र पुन्हा हे विमान मुंबईत परतले. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी मुंबईहून लंडनला जाणारे विमान काही वेळातच परत मुंबई विमानतळावर परतले. यामागचे कारण इराणने इस्रायलवर केलेला हल्ला असल्याचे बोलले जाते.
इराणवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणी विमानतळ बंद करण्यात आल्यानंतर एअर इंडियाचे विमान एएल-१२९ पुन्हा मुंबईत परतले. इराणवर इस्रायलने हल्ला केल्यानंतर इराणचे एअरस्पेस बंद करण्यात आले आहे. या मार्गाने जाणाऱ्या सर्व विमानाचे मार्ग वळवण्यात आले आहेत.