Aditya Thackeray Pudhari
मुंबई

Aditya Thackeray | ... तर उद्या ‘जय अदानी’ म्हणण्याची वेळ येईल : आदित्य ठाकरे

धारावीकरांच्या न्याय्य हक्कासाठी सर्वपक्षीय आंदोलनात आदित्य ठाकरेंचा सरकारवर घणाघाती हल्लाबोल; मुंबईची १६०० एकर जमीन घशात घालण्याचा आरोप

पुढारी वृत्तसेवा

Dharavi Redevelopment Project

मुंबई : धारावीच्या पुनर्विकासाच्या नावाखाली मुंबईची तब्बल १६०० एकर जमीन अदानींच्या घशात घालण्याचा डाव आखला जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी केला. धारावीतील त्रिकोणी गार्डन येथे पार पडलेल्या सर्वपक्षीय आंदोलनात सहभागी होत त्यांनी धारावीच्या पुनर्विकासाबाबत पक्षाची ठाम भूमिका स्पष्ट केली आणि राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. 

भाजप म्हणते 'सबका मालिक एक अदानी’ मात्र ही भूक इथेच रोखणे गरजेचे आहे असे म्हणत देशावर भाजपची नव्हे तर भाजपवर अदानींची सत्ता गाजत असल्याचा निशाणा त्यांनी साधला. १० ऑक्टोबर २०२२ रोजी हे टेंडर दिले गेले तेव्हा येथे 'अदानींच्या गुलामांचे' भाजप सरकार होते आमचे सरकार असते, तर धारावीकरांना ५०० चौ. फुटांचे घर आणि त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करणाऱ्यालाच हे टेंडर मिळाले असते असे त्यांनी ठणकावून सांगितले. 

एकीकडे अदानींचे साडेसात हजार कोटी रुपये माफ करणारे सरकार चोवीस तास ड्युटी करणाऱ्या पोलिसांकडून मात्र दीड कोटींची कन्स्ट्रक्शन कॉस्ट वसूल करत असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. मुंबईकरांनो तुम्ही मुंबईत जन्माला आला आहात, तुम्हाला कोणी १६०० चौ. फूट जमीन फुकट देणार आहे का? हल्ली तर श्वास घ्यायलाही पैसे मोजावे लागतात असा संतप्त सवाल त्यांनी उपस्थित केला. 

बीकेसीसह मुंबई आणि ठाण्यातील जमिनी गिळून महाराष्ट्राची ओळख बदलण्याचा प्रयत्न सुरू आहे. तुम्हाला जगात जे करायचे ते करा पण आम्ही मुंबई लुटू देणार नाही. “तुम्हाला मुंबईसमोर नतमस्तक होऊनच काम करावे लागेल” असा सज्जड इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT