मुंबई

अभिनेते सयाजी शिंदे यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश

रणजित गायकवाड

पुढारी ऑनलाईन डेस्क : अभिनेते सयाजी शिंदे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदारा सुनील तटकरे, मंत्री छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल उपस्थित होते.

यावेळी खासदार तटकरे यांनी भावना व्यक्त करत म्हटले की, ‘सयाजी शिंदे यांचे चित्रपट क्षेत्रात मोठे योगदान आहे. त्यांनी सामाजिक उपक्रम राबवून समाजाला दिशा देण्याचे काम क्ले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये येण्याने आमच्या पक्षाला ताकद मिळणार आहे’

यावेळी अजित पवार यांनी सयाजी शिंदे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली. ‘सयाजीरावांना कोणत्या जबाबदाऱ्या द्यायच्या याची चर्चा झाली. विधानसभेत त्यांना पक्षाचे स्टार प्रचारक म्हणून कार्य देणार आहे. त्यांच्या राजकीय प्रवासाबाबत त्यांनी विचारलं. त्यांच्याशी आमची व्यवस्थित चर्चा झाली आहे. मी जबाबदारीने सांगतो, राष्ट्रवादीत सयाजी शिंदे यांचा आदर आणि सन्मान राखला जाईल. त्यात अडचण येणार नाही. कार्यकर्त्यांकडूनही येणार नाही. मी आज एक चांगला निर्णय घेतला आहे. मला त्याचं समाधान आहे’, अशी भूमिका अजित पवार यांनी यावेळी मांडली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT