पुढारी ऑनलाईन डेस्क: ज्येष्ठ अभिनेते, चित्रपट निर्माते मनोज कुमार यांचे शुक्रवारी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रूग्णालयात निधन झाले. ते ८७ वर्षाचे होते. मनोज कुमार हे त्यांच्या देशभक्तीपर चित्रपटांसाठी अधिक लोकप्रिय होते, त्यामुळे त्यांची 'भारत कुमार' अशी ओळख बनली होती. त्यांच्यावर आज (दि.५) अंत्यसंस्कार होणार आहेत.
दिग्गज अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक मनोज कुमार यांच्या निवासस्थानातील दृश्ये 'ANI'ने शेअर केले आहेत. अभिनेते मनोज कुमार यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आले आहे. आज सकाळी ११.३० वाजता मनोज कुमार यांच्या पार्थिवावर वन हंस स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जातील, अशी माहिती देखील एएनआयने दिली आहे.