Abu Salem parole rejection Pudhari
मुंबई

Abu Salem parole rejection : गँगस्टर अबू सालेमला झटका

पॅरोल देण्याची मागणी हायकोर्टाने फेटाळली

पुढारी वृत्तसेवा

मुंबई ः अंडरवर्ल्ड गँगस्टर अबू सालेमला उच्च न्यायालयाने मोठा झटका देताना त्याची पॅरोलची मागणी फेटाळून लावली आहे.

भावाच्या निधनानंतरचे विधी पार पाडण्यासाठी तातडीचा पॅरोल देण्याचा लेखी विनंती अर्ज सालेमने खंडपीठाकडे केला होता. तथापि, न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती श्याम चांडक यांच्या खंडपीठाने ही मागणी फेटाळून लावली आहे.

आपल्याला आझमगड येथील मूळ गावी जाण्याची परवानगी मिळावी, असे सालेमने म्हटले होते. विशेष म्हणजे त्यासाठी आवश्यक असलेल्या पोलीस संरक्षणाचा खर्च उचलण्यास त्याने नकार दिला होता.

या आधी झालेल्या सुनावणीवेळी खंडपीठाने अबू सालेमला पोलीस संरक्षणाचे शुल्क भरा, अन्यथा याचिका मागे घ्या, अशी सूचना केली होती. या पार्श्वभूमीवर गुरुवारी सालेमच्या वतीने ॲड. फरहाना शाह यांनी पोलीस संरक्षणाचा खर्च उचलण्यास अबू सालेम असमर्थ असल्याचे न्यायालयाला सांगितले. यानंतर खंडपीठाकडून याचिका निकाली काढण्यात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT