पंचरंगी लढतीत अभ्यंकर 4 हजार 83 मते मिळवून विजयी Pudhari File Photo
मुंबई

मुंबई शिक्षक मतदारसंघातून चुरशीच्या लढतीत अभ्यंकर विजयी

करण शिंदे

मुंबई, पुढारी वृत्तसेवा : विधान परिषदेच्या मुंबई शिक्षक मतदार संघाच्या व्दिवार्षिक निवडणुकीची मतमोजणी सोमवारी नेरुळ येथील पार पडली. या ठिकाणी मतमोजणीसाठी एकूण 14 टेबल ठेवण्यात आले होते. या निवडणुकीत एकूण 12 हजार मतदारांनी मतदान केले होते. या शिक्षक मतदारसंघातून शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर चुरशीच्या लढतीत विजयी झाले आहेत.

एकुण झालेल्या मतदानापैकी 11 हजार 598 मते वैध ठरली, तर 402 मते अवैध ठरली. जिंकून येण्यासाठी 5 हजार 800 इतक्या मतांचा निश्चित कोटा ठेवण्यात आला होता. बाराव्या फेरी अखेर शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार जगन्नाथ मोतीराम अभ्यंकर हे सर्वाधिक मते मिळवून मुंबई शिक्षक मतदार संघातून निवडून आले आहेत. या घटनेचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा विभागीय आयुक्त पी. वेलरासू यांनी जाहीर केले.

याचबरोबर मुंबई शिक्षक मतदारसंघातून पंचरंगी लढत झाली आहे. यामध्ये भाजपचे शिवनाथ दराडे, शिक्षक भारतीचे सुभाष मोरे, शिंदेसेनाचे शिवाजी शेंडगे, राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) शिवाजी नलावडे, यांनी धुळ चारत उध्दवसेनेचे ज.मो. अभ्यंकर यांनी या पंचरंगी लढतीत विजय मिळवला आहे. मुंबई पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुतीला पराभव पत्करावा लागला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT