Abhijeet Dipke File Photo
मुंबई

Abhijeet Dipke: 'देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचा अधिक...'; PM मोदींच्या सेल्फी व्हिडिओवर अभिजीत दिपकेंची उपरोधिक टीका

'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सेल्फी व्हिडिओवर उपरोधिक टीका केली आहे.

पुढारी वृत्तसेवा

Abhijeet Dipke

मुंबई: "देशाच्या भविष्यापेक्षा तुमची त्वचा अधिक उजळ दिसते," अशी उपरोधिक टीका 'कॉकरोच जनता पार्टी'चे संस्थापक अभिजीत दिपके यांनी गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली. संसदेने 'सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक, २०२६' मंजूर केल्याबद्दल पंतप्रधानांनी एक सेल्फी-शैलीतील व्हिडिओ जारी केला होता, त्यावर दिपके यांनी ही प्रतिक्रिया दिली.

व्हिडिओमध्ये, पंतप्रधान मोदींनी नवीन कायद्याचे वर्णन 'न्याय्य आणि विश्वासार्ह परीक्षा प्रणाली सुनिश्चित करण्याच्या दिशेने टाकलेले एक महत्त्वपूर्ण पाऊल' असे केले. "पेपर माफिया"वर कठोर कारवाई केली जाईल यावर भर देत, त्यांनी सांगितले की सरकार तंत्रज्ञानाचा वापर आणि कठोर कायदेशीर उपाययोजनांद्वारे परीक्षा प्रक्रिया अधिक बळकट करत राहील.

या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना अभिजीत दिपके यांनी, "देशाच्या भविष्यातापेक्षा तुमची त्वचा अधिक उजळ आहे," अशी उपरोधिक टिप्पणी केली. पेपरफुटीच्या मुद्द्यावर पंतप्रधानांनी प्रसिद्ध केलेला हा सलग चौथा सेल्फी-शैलीतील व्हिडिओ असून, विरोधकांसह CJPकडूनही या सोशल मीडिया मोहिमेवर टीका करण्यात येत आहे.

'राजकारण सोडा, इन्फ्लुएन्सर व्हा'

दिपके यांनी यापूर्वीही पंतप्रधान मोदींवर टीका करत त्यांना राजकारण सोडून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर बनण्याचा सल्ला दिला होता. बुधवारी महाराष्ट्रातील आपल्या मूळ गावी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, "मोदी उत्तम इन्फ्लुएन्सर आहेत. जर ते इतके चांगले इन्फ्लुएन्सर असतील, तर त्यांनी पंतप्रधानपद सोडावे आणि इन्फ्लुएन्सर म्हणून काम करावे. देश चालवण्याची जबाबदारी दुसऱ्या कुणालातरी द्यावी."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT