Aaishvary Thackeray Cyber Fraud Pudhari
मुंबई

Aaishvary Thackeray Cyber Fraud: स्मिता ठाकरे यांच्या मुलाची ऑनलाइन फसवणूक; बँक खात्यातून १९ हजार रुपये गायब

मोबाईलवर आलेल्या मेसेजमधील लिंक उघडल्यानंतर खात्यातून पैसे काढल्याचे लक्षात आले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आणि जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांचे चिरंजीव ऐश्‍वर्य ठाकरे यांची अज्ञात सायबर ठगाने ऑनलाईन फसवणूक केल्याचा प्रकार अंधेरी परिसरात उघडकीस आला आहे.

मोबाईलवर आलेल्या मॅसेजवरील लिंक ओपन करणे त्यांना चांगलेच महागात पडले. अज्ञात सायबर ठगाने त्याच्या बँक खात्यातून १९ हजार ६३८ रुपयांवर डल्ला मारल्याचे पोलिसांनी सांगितले.

ऐश्‍वर्य ठाकरे हे अंधेरीतील विंडसर ग्रँड रेसीडन्सी अपार्टमेंटमध्ये राहत असून एका खासगी कंपनीत कामाला आहेत. त्यांच्यासोबत त्यांची आई स्मिता आणि आजी कुंदा चित्रे राहतात. ३० ऑक्टोबरला रात्री दीड वाजता ऐश्‍वर्य हे घरी होते.

यावेळी त्यांच्या मोबाईलमध्ये एक मॅसेज प्राप्त झाला होता. त्यात खात्यातून काही रक्कम डेबिट झाल्याचे म्हटले होते. त्यानंतर त्यांना बँकेतून आणखी पाच मॅसेज आले. त्यातही पैसे डेबिट झाल्याचे दिसून आले. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी बॅलेन्स जाणून घेण्याचा प्रयत्न केला आणि फसगत लक्षात आली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT