मुंबई : मुंबईतील मुसळधार पावसामुळे अंधेरी सिपज कंपनी गेट क्रमांक ३ समोरील रस्त्यावरील उघडया चेंबरमध्ये पडून पवईतील मिलिंद नगर येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. विमल अप्पाशा गायकवाड असे मृत महिलेचे नाव आहे.
विमल या सीपज कंपनीत कामाला होत्या. बुधवारी रात्री घरी जात असताना तुफान पावसात पाण्याचा अंदाज न आल्याने गेट समोरील उघड्या नाल्यात त्या पडल्या आणि वाहून गेल्या. अग्निशमन दलाच्या अथक प्रयत्नांमुळे विमल यांना शोधण्यात यश आले. त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.