A case against colleagues in the case of molestation of a 24-year-old girl
२४ वर्षांच्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी सहकार्‍यांविरुद्ध गुन्हा File Photo
मुंबई

२४ वर्षांच्या तरुणीच्या विनयभंगप्रकरणी सहकार्‍यांविरुद्ध गुन्हा

पुढारी वृत्तसेवा

अंधेरीतील एका खाजगी कंपनीतील २४ वर्षांच्या तरुणीचा तिच्याच सहकार्‍याने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शादाब खान या कर्मचार्‍याविरुद्ध सहार पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. ट्रेकिंगला गेलेली ही तरुणी फ्लॅटमध्ये एकटीच असताना शादाबने तिच्याशी अश्‍लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. गुजरातच्या वापीची रहिवाशी असलेली ही तरुणी अंधेरी येथे राहत असून एका खाजगी कंपनीत कामाला आहे.

६ जुलैला तिच्या कंपनीचे सर्व सहकारी ट्रेकिंगसाठी बदलापूरला गेले होते. तिथे ते सर्वजण एका फ्लॅटमध्ये थांबले होते. ७ जुलेला तिचे सर्व सहकारी ट्रेकिंगला गेले. तिला झोप येत असल्याने ती फ्लॅटमध्ये एकटीच होती. यावेळी तिथे तिचा सहकारी शादाब आला आणि त्याने झोपेत असताना तिच्याशी जवळीक साधून तिचा विनयभंग केला होता. हा प्रकार नंतर तिने तिच्या सहकार्‍यासह एचआर मॅनेजरला सांगितला. त्यांनी तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने सहार पोलिसांना घडलेला प्रकार सांगून शादाबविरुद्ध तक्रार केली होती. या तक्रारीची शहानिशा केल्यानंतर शादाबविरुद्ध पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे. या गुन्ह्यांचा तपास सुरु असून लवकरच त्याची पोलिसांकडून चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

SCROLL FOR NEXT