A 65-year-old diamond merchant ended his life
६५ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे व्यापार्‍याने संपवले जीवन File Photo
मुंबई

६५ वर्षांच्या वयोवृद्ध हिरे व्यापार्‍याने संपवले जीवन

करण शिंदे

हिरे व्यापारी असलेल्या संजय शांतीलाल शहा या ६५ वर्षांच्या वयोवृद्ध रविवारी सकाळी ताज हॉटेलसमोरील समुद्रात उडी घेऊन जीवन संपवले. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे मानसिक नैराश्यातून त्यांनी जीवन संपवल्याचे बोलले जाते. याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अपमृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. संजय शहा हे हिरे व्यापारी असून त्यांच्या कुटुंबियांसोबत महालक्ष्मी परिसरात राहत होते.

गेल्या तीन वर्षांपासून त्यांना हिरे व्यवसायात प्रचंड नुकसान झाले होते. त्यामुळे ते काही दिवसांपासून मानसिक तणावात होते. रविवारी सकाळी ते मॉर्निंग वॉकसाठी घरातून बाहेर पडले. एका टुरिस्ट टॅक्सीतून वरळी सी लिंकवर राऊंड मारुन ते गेटवे ऑफ इंडियाजवळ गेले. ताज हॉटेलजवळील नार्थ कोर्टसमोर आल्यानंतर त्यांनी समुद्रात उडी घेतली होती. हा प्रकार तिथे गस्तीवर असलेल्या एका पोलीस कर्मचार्‍याचे लक्षात आले. त्यामुळे त्याने कुलाबा पोलिसांना ही माहिती दिली होती.

घटनास्थळी गेलेल्या कुलाबा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या जवानांनी संजय शहा यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही माहिती नंतर त्यांच्या कुटुंबियांना देण्यात आली होती. त्यांच्या जबानीतून व्यवसायातील नुकसानीमुळे संजय शहा हे मानसिक तणावात होते. त्यातून आलेल्या नैराश्यातून त्यांनी ते टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला आहे. या जबानीनंतर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली होती.

SCROLL FOR NEXT