Mumbai Crime News
पूर्ववैमस्नातून २४ वर्षांच्या तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला file photo
मुंबई

पूर्ववैमस्नातून २४ वर्षांच्या तरुणावर तलवारीने प्राणघातक हल्ला

पुढारी वृत्तसेवा

पूर्ववैमस्नातून स्टेनी शांतकुमार दोडमनी या २४ वर्षांच्या तरुणावर चारजणांच्या टोळीने तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची घटना धारावी परिसरात घडली. हल्ल्यात जखमी झालेल्या स्टेनीला शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी चारही मारेकर्‍याविरुद्ध धारावी पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदवून पळून गेलेल्या मारेकर्‍यांचा शोध सुरु केला आहे.

स्टेनी हा धारावीतील बसडेपोसमोरील जय हनुमान चाळीत राहत असून चालक म्हणून काम करतो. शोएब, त्याचा भाऊ आणि इतर दोन तरुण याच परिसरात राहत असून ते एकमेकांच्या परिचित आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांच्यात क्षुल्लक कारणावरुन वाद झाला होता. त्याचा शोएबसह इतर तिघांच्या मनात राग होता. गुरुवारी सकाळी नऊ स्टेनी हा त्याच्या मित्रासोबत राजीव गांधी स्पोटर्स क्लबसमोर गप्पा मारत होते. यावेळी तिथे शोएब, त्याचा भाऊ व त्याचे दोन मित्र आले. या चौघांनी पूर्वी झालेल्या वादातून स्टेनीवर तलवारीने वार केले होते. त्यात त्याच्या कानाला, गालाला आणि दोन्ही हाताला गंभीर दुखापत झाली होती. हल्ल्यानंतर ते चौेघेही पळून गेले होते.

स्टेनीला त्याच्या मित्रासह इतर स्थानिक रहिवाशांनी तातडीने जवळच्या शीव रुग्णालयात दाखल केले. तिथे त्याला आंतरुग्ण म्हणून दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले. ही माहिती मिळताच धारावी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी स्टेनीची जबानी नोंदवून पोलिसांनी चारही मारेकर्‍याविरुद्ध हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा दाखल केला होता. हल्ल्यानंतर चौघेही पळून गेल्याने त्यांच्या अटकेसाठी पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेतली आहे.

SCROLL FOR NEXT