मुंबई

Mumbai Cylinder Blast : मुंबईतील चेंबूर कॅम्प परिसरात सिलिंडरचा स्फोट; ९ जण जखमी

मोहन कारंडे

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : चेंबूर कॅम्प सी. जी. गिडवानी रोडवरील स्मोक हिल सलूनच्या पाठीमागे एका तळ अधिक एक मजली दुकानात सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना गुरुवारी सकाळी ७ वाजून ३७ मिनिटांनी घडली. यामध्ये ९ जण जखमी झाले असून त्यातील ८ जणांवर गोवंडीच्या शताब्दीत तर एका जखमीला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

स्मोक हिल सलूनच्या पाठीमागे एका घरामध्ये सकाळी अचानक सिलिंडरचा स्फोट झाला. त्यामुळे आजूबाजूचे दोन ते तीन दुकानांच्या भिंती कोसळल्या. सिलिंडर स्फोटामुळे वायरिंग व लाकडी फर्निचरने पेट घेतला. स्थानिकांनी अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत ओम लिंबाजिया (वय ९) अजय लिंबाजिया (वय ३३), पूनम लिंबाजिया (वय ३५), मेहक लिंबाजिया (वय ११), ज्योत्स्ना लिंबाजिया (वय ५३), पियुष लिंबाजिया (वय २५), नितीन लिंबाजिया (वय ५५), प्रीती लिंबाजिया (वय ३४) यांना गोवंडीच्या शताब्दीत तर सुदाम शिरसाठ (वय ५५) यांच्यावर सायन रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यामध्ये चौघांची प्रकृती गंभीर आहे.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT