Ashish Shelar Pudhari
मुंबई

Mumbai School Vacant Posts: शाळांच्या सुविधा तपासणी अधिकाऱ्यांची पदे भरा; आशिष शेलार यांचे मुंबई महापालिकेला निर्देश

ही बाब चिंताजनक असून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी प्रशासनाला दिले.

पुढारी वृत्तसेवा

मुंबई: मुंबई महापालिका क्षेत्रातील शासनाच्या माध्यमिक शाळा, पालिकेच्या तसेच अनुदानित व विना अनुदानित प्राथमिक शाळांमधील भौतिक सुविधा तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची ८९ पदे रिक्त आहेत. ही बाब चिंताजनक असून ही रिक्त पदे तातडीने भरण्यात यावी, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलार यांनी प्रशासनाला दिले.

मुंबई शहर व उपनगरातील सर्व शाळांमधील पायाभूत सुविधा, शैक्षणिक गुणवत्ता, विद्यार्थ्यांची सुरक्षितता व उपलब्ध सोयी-सुविधांचा मंत्री शेलार यांनी आढावा घेतला.

मुंबई महापालिका क्षेत्रात राज्य शासनाच्या मान्यतेने पूर्व उपनगरातील २४०, पश्चिम उपनगरातील २६५ अशा ५०५ माध्यमिक शाळा आहेत. या शाळांच्या भौतिक सुविधा तपासणीसाठी पंधरा शिक्षण उपनिरीक्षक व सहाय्यक उपनिरीक्षक आहेत.

तर, १८ पदे रिक्त आहेत. महापालिकेच्या १ हजार १३२ प्राथमिक शाळा असून १ खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळा आहेत. अशा २ हजार १३२ शाळांच्या भौतिक सुविधा तपासणीसाठी ११ विभाग निरिक्षक ११ असून ७१ पदे रिक्त आहेत.

शाळांच्या तपासणीची यंत्रणा सक्षम करावी

मोठ्या प्रमाणावर पदे रिक्त असल्याने शाळांच्या भौतिक सुविधा आणि शैक्षणिक व्यवस्थेची प्रभावी व नियमित तपासणी करण्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ज्याचा परिणाम शैक्षणिक व्यवस्थेवर होऊ शकतो. म्हणून तपासणी अधिकाऱ्यांची रिक्त पदे तातडीने भरण्याची प्रक्रिया सुरू करुन शाळांच्या तपासणीची यंत्रणा अधिक सक्षम करावी, असे स्पष्ट निर्देश आशिष शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

पदे रिक्त असल्याचे बैठकीत उघड

शाळांमध्ये स्वच्छता गृहे, इमारत, वर्ग खोल्या, लाईट, पाणी, सुरक्षा या सारख्या १० विविध भौतिक सुविधांंची तपासणी महापालिका आणि राज्य शासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांमार्फत दर तीन वर्षांनी होते. मात्र, या पदावरील अधिकाऱ्यांची ८९ पदे रिक्त असल्याचे बैठकीत निदर्शनास आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT